माण प्रतिनिधी / सचिन पवार : मौजे मोही ता.माण या गावामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोही शाळेतील विद्यार्थ्यानी स्व.यशवंतराव चव्हाण लोकनृत्य तालुकास्तरीय स्पर्धेत लोकगीतातील आदिवासी गीत सादरीकरण करण्यात आले. निसर्गातील विविध घटक एकमेकांवर कसे अवलंबून असतात .वनसंपत्ती , प्राणी पक्षीसह निसर्गाच्या सानिध्यातील सर्व सजीव सृष्टीबाबत लोकनृत्यातून जनजागृतीचा संदेश देण्यात आला. या लोकनृत्यात गाणे, वाद्य व नृत्य विध्यार्थ्यानी केले. पथकात 16 जणांनी समूहिक आदिवासी गीत सादर केले. तालुकास्तरीय लोकनृत्य स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोही या शाळेने प्रथम क्रमांक पटकवला. लोकनृत्य पथकास शैलेन्द्र साळुंखे, लताबाई आवळे, अरविंद आघाव,अनिल घाडगे, संध्या रोडगे यांनी मार्गदर्शन केले.
तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवल्याबद्द्ल गटशिक्षणाधिकारी माणिक राऊत, विस्ताराधिकारी लक्ष्मण पिसे ,केंद्रप्रमुख अशोक गंबरे ,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बापूराव साळुंखे ,मुख्याद्यापक शैलेन्द्र साळुंखे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Leave a reply