भिवंडी प्रतिनिधी / दिशा शक्ती न्यूज़ : 7 डिसेंबर , भिवंडीमध्ये गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली असून भिवंडी तालुक्यातील कशेळी बस स्टॉपवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यावर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. गणेश कोकाटे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून गोळीबार झाल्यानंतर गणेश कोकाटे याला ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले गोळीबाराच्या घटनेनंतर नारपोली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढच्या तपासाला सुरूवात केली आहे. गणेश कोकाटे याच्यावर झालेला गोळीबार वैयक्तीक वादातून झाला का यामागे काही राजकीय वादाचा एँगल आहे, याचा तपास पोलीस करत आहेत
HomeUncategorizedभिवंडी तालुक्यातील कशेळी बस स्टॉपवर गोळीबार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्याचा मृत्यु