दिशा शक्ती / रमेश खेमनर : शेवगाव ( अ. नगर ) : कुठ्ल्यांही महापुरुषाच्या राष्ट्रीय उत्सव व जयंती, पुण्यतिथी सोहळ्याच्या दिवशी अवैध धंद्यांना राज्य सरकारने घातली असते, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात तसेच शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन उत्सवात साजरा होत असताना तालुक्यातील परमीट व देशी दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांनाही शहरातून जाणाऱ्या शेवगाव- पाथर्डी, शेवगाव -नेवासा, शेवगाव- गेवराई, शेवगाव- पैठण या राज्य मार्गावर असलेल्या परमिट धारक व बीअरबार चालक हे छुप्या मार्गाने देशी-विदेशी दारू विकत असल्याचे चित्र मंगळवारी शेवगावमध्ये पहावयास मिळाले. हे सर्व चित्र पोलीस व दारू बंदी उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादामुळे सर्वत्र दारूच्या दुकानात दारू चोरट्या मार्गाने मिळत असल्याने दारू पिणाऱ्या आंबट शौकिनांची शेवगावमध्ये सोय झालेली पहावयास मिळाली.
एकदंरीत पाहिलं तर यावर दारूबंदी राज्य उत्पादन विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून आले. इतकेच नव्हे तर शहरातील परवाना नसलेले हॉटेल मध्ये हि सर्हासपणे दारू विक्री होत होती. याबाबत मात्र दारूबंदी विभागांच्या अधिका-यांना विचारले असता. बहुतेक अधिकारी यांचे फोन उचलत नव्हते, तर काही अधिका –यांनी पत्रकारांचे ब्लाक लिस्ट मध्ये टाकल्याचे आढळून आले. याबाबत दारूबंदी विभागाला खरच काही माहिती का ? का दारूबंदी विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. यामुळे दारूबंदी विभागाच्या कार्यशैलीवर जनतेतून संशय निर्माण होत आहे. एकंदरीतच तालुक्यामध्ये होत असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका यामुळे त्या अवैध दारू विक्रीमुळे डोकेदुखी निर्माण होण्याची शक्यता आहे. अनेक वेळा तालुक्यातील विविध गावामधून दारूबंदीची मागणी महिला करतांना दिसत आहे. परंतू दारूबंदीचे अधिकारी कोणतेही सोयिर सुतक नसल्याचे दाखवत स्वतःच्या कार्यशैलीवर प्रश्ननिर्माण करत आहे.यावर एक्ससाईज चे जिल्हाधिकारी लक्ष घालतील का?
शेवगांव शहरात अनेक बियर शॉपी यां रहिवासी एरियात आणि शाळा महाविद्यालय खासगी क्लास जवळ असल्याने युवक तरुण व्यसनाधीन होण्याच्या शक्यता नाकारता येत नाही नगरपरिषद च्या एन ओ सी कोणी व कश्या दिल्या हा संशोधनाचा विषय आहे ??