Disha Shakti

Uncategorized

पाथर्डी तालुका सराफ सुवर्णकार व्यावसायिक संघटनेचा पारनेर चे आ. निलेश लंके यांच्या उपोषणाला पाठिंबा

Spread the love

प्रतिनिधी / अविनाश देशमुख : अहमदनर जिल्ह्यातील पाथर्डी शेवगांव अहमदनगर आणि दक्षिण भागातील अतिशय दयनीय अवस्थेत असलेले रस्त्यांचे कामं जो पर्यंत सुरु होत नाही तो पर्यंत पारनेर चे लोकप्रिय आमदार मा. निलेश लंके यांच्या आमरण उपोषणाला जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनर येथे सुरुवात झाली सर्व पाथर्डी तालुका सराफ,सुवर्णकार संघटना त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज नगर ला गेले होते  आमदार निलेश लंके यांची नगर येथे उपोषण स्थळी भेट घेत रस्त्याच्या प्रश्ना संदर्भात पाथर्डी तालुका सराफ सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज ता. 7 डिसेंबर रोजी सायंकाळी  पाठिंबा दर्शविला.यावेळी आमदार निलेश लंके, क्षितिज घुले, तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, बंडू पाटील बोरुडे, गहिनीनाथ शिरसाट,चांद मणियार, किसन आव्हाड यासह आदींची भेट घेत चर्चा केली.

यावेळी सराफ संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब जिरेसाळ,राजेंद्र शेवाळे,मधुकर शहाणे,संजय दराडे,बाळासाहेब शहाणे,सुनिल शहाणे आदी सराफ व्यावसायिक उपस्थित होते. श्री.राजेंद्र शेवाळे, श्री.बाळासाहेब जिरेसळ, मधुकर मानुरकर यांनी सक्रिय पाठींबा व्यक्त केला

गेल्या पाच सहा वर्षांपासुन अतिशय खराब झालेले सर्वच राज्य महामार्ग  शेवटच्या घटका मोजत आहेत पण विद्यमान खासदार आमदार आणि जिल्हा प्रशासनाला त्याचे काही सोयर सुतक नाही आता निकराचा लढा दिल्याशिवाय न्याय मिळणार नाही सार्वजनिक बांधकाम विभागातील गेंडयाच्या कातडीचे लोकआणखी किती जीव घेतल्यावर  जागे होणार??? हा एक प्रश्नच आहे

अविनाश देशमुख  (शेवगांव सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार)


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!