Disha Shakti

Uncategorized

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद नव्या टप्प्यावर! आक्रमक ‘मनसेचे मात्र गांधीगिरीच्या मार्गावर आंदोलन

Spread the love

माढा तालुका प्रतिनिधी / संतोष पांढरे (मोडनिंब) : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला असताना महाराष्ट्रातील वाहनांना कर्नाटक मध्ये तोडफोड, एसटी बसेस ची जाळपोळ करून नुकसान करत आहेत. कर्नाटकातील या दादागिरीमुळे राज्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत मात्र सन्मानीय. श्री.राज ठाकरे साहेबांनी कर्नाटकात मुख्यमंत्र्यांना आदेश दिला आहे की चर्चेतून हा वाद सोडवावा त्यामुळे नेहमीच आक्रमक असणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) गांधीगिरीच्या मार्गावर आंदोलन करत आहे. वरवडे टोल नाका (मोडनिंब जवळील) येथे कर्नाटकातून येणाऱ्या वाहनचालकांचा मनसे जिल्हाध्यक्ष श्री.प्रशांतजी गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली फुल गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे.

प्रशांतजी म्हणाले की वास्तविक पाहता सोलापूर, सांगली, कोल्हापूर हे जिल्हे कर्नाटकच्या सीमेवर आहेत. कर्नाटक व महाराष्ट्र मधील लोकांचे पाहुण्यांचे रूणानुबंध आहेत.त्यामुळे आम्ही कर्नाटक सरकारला व जनतेला सांगु इच्छित आहे की महाराष्ट्रातून येणाऱ्या खाजगी अथवा सरकारी वाहनांची तोडफोड, जाळपोळ नुकसान करून आंदोलन करू नका.चर्चेतून हा सीमावाद मिटवा अशी मागणी करत आहोत.अन्यथा दोन दिवसांनी महाराष्ट्रात कर्नाटक चे एकही वाहन राज्यात येवू न देण्याचा इशारा सोलापूर मनसे जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांतजी गिड्डे यांनी दिला आहे. छत्रपतींच्या महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की जे आहे त्या पद्धतीने चालावे. त्यामुळे कर्नाटक सरकार ने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा मनसे कर्नाटक विरुद्ध तीव्र आंदोलन करेल.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!