Disha Shakti

Uncategorized

लोकनेते.स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त ढाकणी येथे दैवत फाऊंडेशनतर्फे भव्य रक्तदान शिबीर संपन्न

Spread the love

पळशी प्रतिनिधी / काकासाहेब खाडे : सोमवार दिनांक १२ डिसेंबर २०२२ रोजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री बहुजनांचे दैवत, लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे (साहेब) यांच्या ७३ व्या जयंतीचे औचित्य साधून दैवत फाउंडेशन महाराष्ट्र राज्य माण तालुका यांच्यामार्फत पुनःश्च एकदा भव्य रक्तदान शिबीर (वर्ष तिसरे) हा कार्यक्रम माण तालुक्यातील ढाकणी ग्रामपंचायत, ढाकणी या नगरीमध्ये मोठ्या उपस्थितांच्या सोहळ्यात ग्रामपंचायत शेजारी (श्री हनुमान मंदिर) या ठिकाणी पार पडला.

या रक्तदान शिबीरामध्ये ढाकणी पंचक्रोशी व ग्रामस्थ,तसेच तरुण युवा वर्ग यांनी रक्तदान करुन आपल्या श्रेष्ठदानाचे कर्तव्य बजावले.या कार्यक्रमाचे आयोजन हे दैवत फाऊंडेशनचे अध्यक्ष मा.श्री.किरण खाडे व त्यांचा पदाधिकारी, सहकारी वर्ग, आणि कार्यकर्ते यांच्या संयुक्त सहकार्याने व संयोजनाने ढाकणी गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ यांच्या अनमोल अशा मार्गदर्शनाने व सहकार्याने पार पडला.या कार्यक्रमामध्ये बहुजणांचे दैवत केंद्रीय ग्रामविकासमंत्री स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला. यावेळी ढाकणी गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक व ढाकणी ग्रामपंचायत, ढाकणी चे सरपंच मा.श्री.शंकर नरबट, ग्रामपंचायत सदस्य व वंजारी सेवा संघ माण तालुकाध्यक्ष युवा नेते मा.श्री.धैर्यशील खाडे (भाऊ), वंजारी सेवा संघांचे सचिव मा.श्री.प्रविण ओंबासे, युवा नेते मा.श्री.सुभाष ओंबासे, संतोष खाडे, विजय नांगरे, सतिश सूर्यवंशी, सागर सानप, ढाकणी विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी बालाजी ब्लड डोनेट ट्रस्ट सातारा यांच्या संपूर्ण सहकारी स्टाफच्या अनमोल प्रतिसादाने व मार्गदर्शनाने एकूण ३० रक्तदात्यांनी आपला मोलाचा बहुमोल असा वेळ काढून रक्तदान केले.रक्तदात्यांस भेट म्हणून पाण्याचा ज्यार व आय.एस.आय नामांकन हेल्मेट भेट म्हणून देण्यात आले.दैवत फाऊंडेशन,महाराष्ट्र राज्य ही एक सामाजिक संस्था असून संपूर्ण महाराष्ट्रभर या संस्थेने प्रत्येक क्षेत्रातील (सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय) इत्यादी क्षेत्रामध्ये तालुका स्तर तसेच जिल्हा स्तरांवरती विविध कार्यक्रम राबवून नेहमीच मोलाचे सहकार्य करीत असते. विशेष म्हणजे प्रत्येकवर्षी मुंडे साहेबांच्या पुण्यतिथी व जयंतीनिमित्त (३ जून व १२ डिसेंबर) रोजी दैवत फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य या दोन्हीही तारखेला रक्तदान शिबीर आयोजित करीत असते.यावर्षीच्या शिबिराचे हे तिसरे वर्ष होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!