वावरहिरे प्रतिनिधी / सचिन पवार : मौजे मोही येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय शाहिरी पोवाडा स्पर्धेमध्ये .सहभाग घेतला होता प्रतापगडचा रणसंग्राम या विषयावर. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहीच्या विद्यार्थ्यांनी पोवाडा सादर केला या पोवाड्यामध्ये शिवचरित्राची माहीती व शाहिरी कलागुणांचे दर्शन विद्यार्थ्यांनी घडवले. प्रतापगडचा रणसंग्राम या पोवाड्यामध्ये अनुराज साठे, वैभवी देवकर, सोहम लावंड, मयूर पवार, चैतन्य जाधव, अंशुमन आघाव व सिद्धी देवकर या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पोवाडा मधून सादरीकरण केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शैलेंद्र साळुंखे, अरविंद आघाव, लताबाई आवळे, संध्या रोडगे, अनिल घाडगे यांनी केले. तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहीने प्रथम क्रमांक पटकवला.सातारा येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी माणिकराव जाधव, विस्तार अधिकारी लक्ष्मण पिसे, रमेश गंबरे, सोनाली विभुते, केंद्रप्रमुख गंबरे साहेब,केंद्र संचालक विजयकुमार शिंदे,शाळा समिती अध्यक्ष बापूराव साळुंखे,मोही ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी वर्गासह मोही ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Leave a reply