Disha Shakti

Uncategorized

तेर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तिरंगी लढत तिन्ही पॅनलचा नारळ फोडून प्रचाराला शुभारंभ

Spread the love

तेर बातमीदार / विजय कानडे : तेर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये तिरंगी लढत असल्यामुळे व सरपंच पदाची थेट जनतेतून निवड असल्यामुळे काट्याची टक्कर होणार का? पारावरच्याचर्चांना उधान धाराशिव तालुक्यातील राजकीय ऐतिहासिक व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण 17 सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतची निवडणूक तिरंगी होत असल्याने अतिशय चुरशीची होत असून सरपंच पद एसटी महिलेसाठी आरक्षित असल्यामुळे सरपंच पदासाठी एसटी प्रवर्गातून तीन महिला नशीब आजमावत आहेत.

भाजप पुरस्कृत डॉक्टर पद्मसिंह पाटील विकास पॅनलचा शुभारंभ आमदार राणाजगजीत सिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सुरेश देशमुख सरपंच पदाचे उमेदवार दीदी लोकेश काळे तर महाविकास आघाडी पुरस्कृत संत गोरोबाकाका विकास पॅनलचा राष्ट्रवादी युवती प्रदेश अध्यक्ष कुमारी सक्षणा सलगर, डॉक्टर जय राजे निंबाळकर, माजी सरपंच महादेव खटावकर तालुका प्रमुख सतीशकुमार सोमानी तसेच राष्ट्रीय समाज पक्ष आणि आम आदमी पार्टी यांचे वैराग्य महामेरू विकास पॅनलचा रासपचे राज्य कमिटी सदस्य आश्रुबा कोळेकर, जिल्हाध्यक्ष एडवोकेट विकास पाटील आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे सचिव मुन्ना शेख उमेदवार व नागरिक यांच्या उपस्थितीत तीनही पॅनलचा नारळ फोडून प्रचारास शुभारंभ करण्यात आला.43 उमेदवार व दोन अपक्ष असे एकूण 45 उमेदवार सदस्य पदासाठी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणांगणात उतरले असून कोण बाजी मारणार तर कुणाचा फटका कुणाला बसणार हे चित्र येणाऱ्या 20 तारखेला स्पष्ट होणार आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!