Disha Shakti

Uncategorized

सातारा-पंढरपूर महामार्गावरील अर्धवट स्थितीत पडलेल्या बांधकामाला जबाबदार कोण? बेजबाबदार कामगिरीने प्रवाशांची होतेय गैरसोय!

Spread the love

पळशी  प्रतिनिधी / काकासाहेब खाडे :- दिनांक १६/१२/२०२२ माण तालुक्यातील सातारा-पंढरपूर महामार्गाचे काम हे सुमारे ४ वर्षांपासून सुरु असून बहुतांशी ठिकाणी हे काम अध्यापही रखडलेल्या अवस्थेत दिसून येतेय.या महामार्गालगत बरेचसे खेडेगावं आहेत त्या सर्वचं गावांतील सर्वसामान्य जनता-जनार्दनांना दैनंदिन गरजेच्या कामकाजांसाठी शेतामध्ये तसेच इतर वस्तींवर पायपीट करावी लागते.त्यातचं बहुतांशी कामे ही तालुक्याच्या ठिकाणी असल्या कारणाने सुमारे ३०-४० किलोमीटर अंतराचा जीवघेणा प्रवास हा माण तालुक्यातील जनतेला करावा लागतोय.त्यातचं या महामार्गालगत पळशी ते मनकर्णवाडी या दरम्यान असणारे गतिरोधक बांधकाम  अद्यापही अत्यंत धोकादायक स्थितीत पडून असल्याने ते जीवघेणे ठरू शकते.

याचं बांधकाम दरम्यान धुळीचे लोटच्या-लोट हवेत उडत असून स्थानिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. खड्डे, धूळ, गतिरोधक वळणे या कारणांतून काही केल्या सुटका होत नसल्याने महामार्गालगत असणारी स्थानिक जनता, वाहन चालक अक्षरशः मेटाकुटीला आलेले आहेत.

संबंधित बांधकाम विभागाने हा रस्ता किमान वाहतुकीसाठी तरी सुयोग्य करावा अशा मागण्या या महामार्गालगत असणाऱ्या स्थानिकांकडून होत आहेत. माण तालुक्यातील गोंदवले बु येथील मश्चिदेपासून ते मेन चौकापर्यंत, फडतरे वस्तीलगत असणारे अस्थाव्यस्त बांधकाम, मनकर्णवाडी स्टॉपलगत वाहतूकीसाठी अडथळे आणणारे बांधकाम आदि ठिक-ठिकाणी या रस्त्याचे काम अपूर्ण राहिलेले आहे.हे काम अपूर्ण राहिल्यामुळे माण तालुक्यातील नागरिकांतून तसेच प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.सातारा-पंढरपूर रस्त्यावरील धूळ आणखी किती दिवस खायची?, या रस्त्यावरील खड्ड्यांमधून प्रवाशांनी आणखी किती दिवस प्रवास करायचा?, रस्त्यातील खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेलेले आहेत याला जबाबदार कोण? सातारा-पंढरपूर महामार्गालगत व्यापारी,फळ विक्रेते, गॅरेजवाले, हातगाडे, खाद्यपदार्थ स्टॉल,हॉटेल वाले यांनी व्यवसाय बंद करायचे का? या महामार्गालगत असणाऱ्या विविध व्यावसायिकांना रस्ता खराब असल्यामुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आलेली आहे.त्यांच्या कुटुंबाच्या होत असलेल्या उपासमारीला जबाबदार कोण? या सर्व प्रकाराला सार्वजनिक बांधकाम विभाग,का नॅशनल हायवे जबाबदार आहे अपूर्ण कामाच्या ठिकाणी अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होऊन काही जणांचे बळीही गेलेले आहेत.अनेक नवीन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात घडलेले आहेत.या खराब रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे एक आव्हानच निर्माण झालेले आहे.या भागात जेव्हा पाऊस पडतो त्यावेळेस या महामार्गावरील हा रस्ता पूर्णपणे चिखलमय झालेला दिसून येतो.त्यातूनच वाहन धारकांना मार्ग काढावा लागतो. या महामार्गावरून प्रवास करताना वाहन धारकांना धुळ खातच प्रवास करावा लागत आहे.

हा अस्तित्वातील रस्ता वाहतुकीसाठी योग्य करण्याची जबाबदारी कोणाची? या अपूर्ण रस्त्यालगत गतिरोधक बसविण्यात आलेले होते परंतु,या गतीरोधकाला मोठ-मोठे खिळे ठोकून बसविण्यात आलेले होते.मात्र मध्यंतरीच्या काळात या गतिरोधकाचा काही रबरी भाग निघून गेलेला आहे व त्या ठिकाणचे फक्त खिळेचं राहिलेले आहेत.जवळपास अर्धा इंच हे खिळे रस्त्याच्या वर आहेत.या खिळ्यावरून कोणत्याही प्रकारचे अवजड वाहन गेल्यास खिळे चाकात घुसून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अर्धवट स्थितीत असणारे हे गतिरोधक,पुलाचे बांधकाम सध्या अपघाताला निमंत्रण देत आहेत.त्या संबंधित रस्ते वाहतूक व बांधकाम विभाग,सातारा या खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हे खिळे काढावेत व होणारे अपघात टाळावेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!