तेर प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेरला श्री .संत गोरोबा काकांची समाधी स्थळ असल्यामुळे प्रसिद्धी आहे. आज ता १९ रोजी सफला एकादशी असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. काकांच्या दर्शनासाठी तेरसह परिसरातील अनेक भाविकांनी दर्शन घेतले .
दर्शनासाठी तेरसह, हिंगळजवाडी, रामवाडी, किणी, पळसप,बुकनवाडी,कोळेकरवाडी,कोळेवाडी,डकवाडी,ढोकी,गोवर्धनवाडी,कावळेवाडी,पानवाडी,भंडारवाडी,दारफळ,काजळा,पवारवाडी, लातूर!मुळेवाडी,थोडसरवाडी, तूगाव, मुरूड, लातूर येथील भाविकांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या.तसेच विविध गावच्या दिंड्याही ज्ञानोबा माउली तुकारामचा गजर करत मोठ्या प्रमाणात दाखल झाल्या होत्या.