Disha Shakti

Uncategorized

झाले इलेक्शन आता जपा रिलेशन… या नवीन संकल्पनेचा माण तालुक्यातील युवा पिढीकडून होतोय सन्मान!

Spread the love

पळशी प्रतिनिधी / काकासाहेब खाडे : तालुक्यातील २७ सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक काल दिनांक १८/१२/२०२२ रोजी संपन्न झाल्या. यामध्ये काही उमेदवारांचा दणदणीत विजय होईल तर,काहींचा पराभव होईल तर,कोणी काटावर निवडून येईल तर,कोणी थोडक्यात अपयशी ठरेल,काही उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यामध्येही काही यशस्वी होतील तर,काही अपयशी.तसे पाहता गावकीचे राजकारण काय आणि भावकीचे राजकारण शेवटी राजकारण हे मात्र अटीतटीचेचं.सत्तेचा सारीपाट हा गेल्या एक महिण्यांपासून आपण आपा-आपल्या गावात, वस्तीवर अनुभवला.निवडून येण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना राबवणे,प्रचार प्रभावीपणे कसा होईल यासाठी अथक प्रयत्न करणे यामुळे कळतं-नकळत आपलेचं आपल्या विरोधात गेले,कोण आपल्या वॉर्डमध्ये तर कोणी विरोधी वॉर्डमध्ये उभे राहून निवडणूक लढले.आपल्याचं घरातली जवळची आणि रक्ताची नाती ही यामुळे प्रतिस्पर्धी बनली.

              एकमेकांचे उणे-दुणे काढून आपण याच्यापेक्षा कसा प्रभावी उमेदवार आहे हे पटवून देण्यात आले.उमेदवारांनी दिवसाची रात्र केली.ढाबे,पाय रंगल्या,विकासकामांचे जाहिरनामे, विकासाची वचनपूर्ती, वेगवेगळ्या चालींवरती बसवलेली विशिष्ट प्रकारची टेक्नॉलॉजीचा पुरेपूर फायदा घेत प्रत्येकाने यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा केलेली आहे.गुलाल कोणाचाही असो सर्व उमेदवार हे आपल्याचं गावातील आहेत. आपलीच आहेत,कोणताही विजय किंवा पराजय हा अंतिम नसतो. शांत रहा संयमी रहा मागील १५ दिवसांपासून ज्या लोकांना हात जोडत होता त्यांना त्रास होईल असे न वागता, गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सर्वांच्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी राग,विरोध,द्वेष या सर्व बाबी विसरून एक होणे गरजेचे आहे. आपल्या कर्तृत्वाने प्रभुत्व निर्माण होईल आणि नेतृत्वाची आणि पराकष्टाची धुरा नक्कीच तुमच्या हातात येईल म्हणूनचं झाले इलेक्शन आता जपा रिलेशन ही थीम ध्यानात ठेवून सर्वांगीण विकासासाठी भविष्यात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.आणि ती प्रत्येक गावातील नागरिकांनी जपली पाहिजे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!