प्रतिनिधी / विजय कानडे : तेर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजप प्रणित डॉक्टर पद्मसिंह पाटील विकास पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार दीदी लोकेश काळे यांची जनतेतून सरपंच म्हणून वर्णी लागली आहे. तेर ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 43 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते त्यापैकी भाजपा पॅनलचे दहा सदस्य व महाविकास आघाडीचे सात सदस्य विजयी झाले आहेत. भाजपचे प्रभाग क्रमांक एक मधून सुवर्णा भास्कर माळी, लतिफा कोरबु प्रभाग क्रमांक दोन मधून सौ राजकन्या काळे व प्रतीक नाईकवाडी प्रभाग क्रमांक तीन मधून नवनाथ पसारे, गीतांजली प्रवीण साळुंखे, अर्चना लोमटे प्रभाग क्रमांक चार मधून श्रीमंत फंड, राम देशमुख प्रभाग क्रमांक पाच मधून अजित कदम हे दहा उमेदवार विजयी झाले.
महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक एक मधून अमोल कसबे प्रभाग क्रमांक दोन अविनाश आगाशे प्रभाग क्रमांक चार भाग्यश्री आंधळे प्रभाग क्रमांक पाच मधून जयश्री रसाळ प्रभाग क्रमांक सहा मधून बापूराव नाईकवाडी, आशा कांबळे, प्रियांका रसाळ हे सात उमेदवार विजयी झाले असून विजयी उमेदवारांनी ढोल ताशाच्या गजरात गावात जंगी मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला.