प्रतिनिधी /शहीनाज मुजावर : शिखर शिंगणापूर , मौजे वावरहीरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये तब्बल दहा वर्षानंतर सत्तांतर झाले पंचवार्षिक निवडणूक 2022 – 27 या कार्यकालाची सुरुवात झाली सन 2012 ते 2022 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये आमदार जयकुमार गोरे यांची सत्ता होती. 2022 ते 27 या पंचवार्षिक निवडणुकीत वावरहिरे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दुरंगी लढत झाली भाजप पुरस्कृत पॅनलचे पॅनल प्रमुख म्हणून चंद्रकांत वाघ तर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे पॅनल प्रमुख शामराव राऊत यांनी काम पाहिले वावरहिरे ग्रामपंचायत ही 11 सदस्य संख्या आहे त्यामध्ये शंकर गोसावी भाजप उमेदवार यांची बिनविरोध निवड झाली .उर्वरित दहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम पार पडला अतिशय चुरशीची निवडणूक होऊन भाजप पुरस्कृत पॅनलचा राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने 9/2 ने पराभव झाला.
सरपंच पदाच्या थेट निवडणुकीमध्ये शालन वाघ विरुद्ध शैला राऊत लढत झाली.त्यामध्ये शालन वाघ यांना 1052 मते मिळाली.तर शैला राऊत यांना 1523 मते मिळाली.शैला राऊत यांनी शालन वाघ यांचा तब्बल 471 मतांनी पराभव करून वावरहीरे ग्रामपंचायतच्या सरपंच पदी विराजमान झाल्या. वावरहिरे ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कारभारी बदलला. विजय उमेदवाराची वावरहीरेमध्ये भव्य मिरवणूक करण्यात आली. प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते खालील प्रमाणे
शैला राऊत 1523 विजयी
शालन वाघ 1052
शोभा जाधव 375 विजयी
सुरेखा जाधव 327
पूजा घनवट 380 विजयी
तुळसाबाई पिसे 326
शिवाजी भोसले 349 विजयी
दत्तात्रय गुळीक 304
हणमंत अवघडे 363 विजयी
दीपक भोसले 126
राणी लांडगे 436 विजयी
सखुबाई मुळीक 285
पूनम खुस्पे 325 विजयी वैशाली खुस्पे 165 नामदेव चव्हाण 405 विजयी
तुळशीराम यादव 249 शांताबाई पांढरे 474 विजयी रंजना कचरे 236 खुल्या पुरुष / महिला प्रवर्गातून राधिका ब्ल्लाळ 298 विजयी शंकर गोसावी बिनविरोध
Leave a reply