Disha Shakti

Uncategorized

महाविकास आघाडीचा सरकारवर हल्लाबोल; ठिय्या आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार निदर्शने

Spread the love

विशेष प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना मराठी भाषिक लोकांना आधार देण्यासाठी, मराठी भाषिकांना महाराष्ट्र तुमच्या पाठीशी उभा आहे. सर्वजण तुमच्यासोबत उभे आहोत असे चित्र निर्माण करण्यासाठी दोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर करायला तयार आहोत त्यामुळे तो ठराव घ्या अशी विनंती करण्यात आली होती. परंतु आज आठवडा संपतोय तरीही त्यांनी तो ठराव घेतला नाही मात्र सोमवारी तो ठराव कोणत्याही परिस्थितीत घेण्यास भाग पाडू.

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांना महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांनी श्रद्धांजली वाहीली. तर यावेळी दुसरीकडे ED सरकार कामकाज करत होते. मुळात सरकारने विधानसभा सदस्य म्हणून आमदार मुक्ता टिळक यांना श्रद्धांजली वाहून कामकाज थांबवायला हवे होते. दरम्यान विधानभवनाच्या पायर्‍यांवर प्रती सभागृह भरवून महाविकास आघाडीच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली.

यावेळी शिवसेना नेते आमदार भास्करराव जाधव, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपले विचार मांडले व महापुरुषांचा अपमान करणार्‍या ED सरकारचा निषेध केला. बेळगाव कारवार आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे… बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे..सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है… कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब… कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध… लोकशाहीचा खून करणार्‍या सरकारचा धिक्कार असो…कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय…सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा… भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो…अशा घोषणा काळ्या पट्टया बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात दिल्या.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!