यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सूरोशे : सर्वजनिक बांधकाम उपविभागीय अंतर्गत कोपरा ते महाळूंगी, लिंगी ते सायखेडा डांबरी रस्त्याच्या पॉचेस कामात अनागोंदिचा कळस गाठला आहे. गावकऱ्यांनी नुकतेच झालेल्या डांबरी रस्ता चक्क हाताने उखडून दाखवत बांधकाम विभागाच्या गुणवत्तेचे बिंग फोडले आहे. आर्णी तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोटाळ्याचे मालिका सुरू आहे.
सध्या या उपविभागाअंतर्गत तालुक्यातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडलेले आहेत. पॉचेस ची कामे करतांना कुठेलेही तांत्रिक,आर्थिक मापदंड वापरले नाहीत. त्याचा प्रतेय लिंगी, सायखेडा कोपरा ते महाळूंगी या रस्त्याच्या पॉचेस कामात आला आहे. लिंगी सेखेद्याच ग्रामस्थ व वाहतूक करणारे लोक यांनी या कामाला भेट देत स्वतःच्या हातानेच डांबरी रस्ता उखडवून दाखविला. त्यामुळे या कामात होणारा घोळ चव्हाट्यावर आला आहे.आणि ग्रामस्थांनी यांच्यावरच कार्यवाही करण्यात यावी अशा प्रकारे मागणी केली.
Leave a reply