प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : शासकीय मैदान साहित्याने घेरले सीईओ सह शाळा प्रशासनाची मुकसमती, अर्नितील देऊरवाडी पुनर्वसन क्षेत्रातील गंभीर प्रकारआर्णी : शहरात पाणी पुरवठ्याच्या महत्त्वकांक्षी योजनेच्या कामाला प्रारंभ झाला. मात्र कंत्राटदाराने खासगी भूखंडाचे भाडे वाचविण्यासाठी चक्कनगरपरिषदेच्या एका शाळेच्या प्रांगणावरच अवैध ताबा केला. लाखोंचे पाईप आणि अजस्त्र यंत्रांनी संपूर्ण जागेचा ताबा घेतला. मात्र, या शाळेत शिकणाऱ्या गोरगरीब चिमुकल्या विद्यार्थ्यांची खेळण्याची हक्काची जागा हिरावल्या गेली आहे. यासंदर्भात येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि दस्तुरखुद्द शाळेचे मुख्याध्यापकही मौन बाळगून आहे. त्यामुळे त्या कंत्राटदाराला प्रांगणाचा ताबा घेण्यासाठी मूकसंमती तर दिली गेली नाही ना, अशी चर्चा आता नागरिकांत आहे.आर्णी तालुक्यातील देऊरवाडी पुनर्वसन परिसरात स्थानिक नगरपरिषदेची शाळा असून गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांच्या आणि सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची ही शाळा आधार ठरत आहे.
शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना मोकळ्या जागेत खेळता यावे,असे शासनाचे धोरण आहे. त्यातूनच शिक्षणाचा हक्क असलेल्या कायदाही अस्तित्वात आला असूनया धोरणाला प्रशासनाकडून हरताळ फासला जात असल्याचे चित्र शहरात आहे.येथील नगरपरिषदेने शासनाने दिलेल्या कोट्यवधीच्या निधीतून शहराच्या पाणीपुरवठ्यची योजना हाती घेतली आहे. या कामाचे रीतसर कंत्राटही दिल्या गेले आहे. शासकीय जमिनीचा अथवा इमारतीचा कुठल्या खासगी व्यक्तीला वापर करायचा असेल तर तसा ठराव नगरपरिषदेच्या सर्वसाधारण समेत घ्यावा लागतो. अथवा, तो ठराव सर्वसाधारण समेत घ्यायचा नसेल तर नगरपरिषद प्रशासन स्वतःच्या स्तरावर भाड्याची रक्कम आकारून प्रांगण अथवा इमारत चापराची एनओसी देऊ शकते. मात्र, देऊरवाडी पुनर्वसन येथील शाळेच्या तावा घेताना कंत्राटदाराने कुठलीही एनओसी घेतली नसल्याची चर्चा नगरपरिषद वर्तुळात आहे. आता मात्र ताबा काढण्यासाठी प्रशासन काय पाऊल उचलेल याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.असताना कंत्राटदाराने एखादा भूखंड भाड्याने घेऊन अथवा स्वतःच भूखंडाची तजवीज करून तेथे साहित्य योजना ठेवणे अपेक्षित असते. मात्र, याबाबीला फाटा देत कंत्राटदाराने देऊरवाडी पुनर्वसन येथील नगरपरिषदेच्या शाळेच्या प्रांगणाचा ताबा घेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाईप आणि बांधकामासाठी लागणारे इतर साहित्य व जेसीबी सारखे अजस यंत्र आणून ठेवले. परिणामी, प्रांगणातील इंचभर जागाही विद्यार्थीवापरू शकत नाही. विद्यार्थी शाळेत तर येतात. मात्र मध्यान्ह सुटीत त्यांना खेळाचा आनंद सवंगड्यां बरोबर घेता येत नाही. त्यांची ही कुचंबना नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांसह शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना चांगलीच ठाऊक आहे. मात्र, कुणीही कंत्राटदाराच्या या अवैध ताब्याला विरोध केलेला नाही.
यासंदर्भात नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला आहे.त्यामळे प्रांगणाच्या या अवैध ताब्याला प्रशासनाची मूकसंमती तर नाही ना अथवा कंत्राटदाराकडून कुठलाही प्रकारचे रेकॉर्ड तयार न करता खासगीत ही जागा भाड्याने दिल्या गेली, अशी नागरिकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे.