प्रतिनिधी / काकासाहेब खाडे : माण-खटावचे विधानसभा सदस्य व भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष असलेले जलनायक आ.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या वाहनाला झालेल्या अपघाताचे वृत्त माण-खटावमधील सर्वसामान्य जनतेपर्यंत येऊन धडकल्यापासून जनतेतून आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रकृतीविषयी चौकशीचे हजारो फोन खणखणू लागलेले आहेत तर,आ.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्यावर वेड्यासारखे प्रेम करणाऱ्या माण-खटावच्या सामान्य जनतेकडुन त्यांची प्रकृती लवकरात लवकर ठणठणीत व्हावी याकरीता आपल्या इष्ट ग्रामदेवतांना साकडेही घालू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. माण-खटावचे आ.श्री.जयकुमार गोरे (भाऊ) हे सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सहभागी होऊन माण-खटावच्या अनेक प्रलंबीत प्रश्नांवरती आवाज उठवत आहेत. त्यांनी येथील विकास कामांबाबतही सरकारचे लक्ष वेधलेले आहे.अशातचं शनिवार व रविवार या दोन दिवसांत अधिवेशनाला सुट्टी असल्याने ते नागपूरहून पुण्यात आले होते तर पुण्यातून ते आपल्या गाडीतून गावी परतत असताना दिनांक २४ रोजीच्या पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास फलटण नजीक असलेल्या बाणगंगा नदीच्या पात्रात त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याचे वृत्त माण-खटावमध्ये येऊन धडकताच येथील जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली ती म्हणजे आमदार जयकुमार गोरे (भाऊ) आणि त्यांच्या समवेत असणाऱ्या सहकाऱ्यांच्या तब्बेती विषयीची प्रत्येकजण आ.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन करु लागला.
सकाळपासून दुपारपर्यंत सुरु असलेल्या या फोनमुळे अक्षरश: काही काळ मोबाईल सर्वर डाऊन झाला. प्रत्येकजण या अपघाताची व आ.जयकुमार गोरे भाऊंच्या प्रकृतीची माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होता. तर काही भाऊ प्रेमींनी सरळ ग्रामदैवत आणि कुलदैवतांची मंदिरे गाठत आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रकृतीविषयी देवाकडे प्रार्थना केली.तर काहींनी साकडेही घातले.सामान्य जनतेचा तारणहार आणि जलनायक अशी ओळख असलेल्या आ.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या अपघाताच्या वृत्ताने फक्त माण-खटावचं नाही तर संपूर्ण सातारा जिल्हा ढवळून निघाला.अनेक कार्यकर्त्यांनी पुण्याकडे कुच केली, शेवटी पुणे येथे होणारी कार्यकर्त्यांची गर्दी पाहून आ.जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या निकटवर्तीयांकडून त्यांची प्रकृती स्थिर असून कोणीही काही काळजी करु नये व पुणे येथे येऊ नये असा मेसेज सोशल मिडीयावरती वायरल करण्यात आला. तेव्हा पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची व कार्यकर्त्यांची गर्दी ओसरली.मात्र त्याचवेळी आपल्या नेत्याला लवकर बरे वाटावे त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी होमहवनही केले.सामान्य जनतेमध्ये आ.जयकुमार गोरे (भाऊ) यांची क्रेज किती मोठी आहे हेच या अपघातावरुन अधोरीखीत होत असले तरी सामान्य जनतेला आपल्या नेत्यावरती असणारे प्रेम दाखविण्यासाठी ईश्वराने पुन्हा अशी वेळ कोणावरचं आणू नये असे माण-खटावची सर्वसामान्य जनता भावूकपणे सांगत आहे.
HomeUncategorizedमाण-खटावच्या सामान्य जनतेकडून आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रकृतीसाठी ग्रामदैवताकडे साकडे!
माण-खटावच्या सामान्य जनतेकडून आपल्या लाडक्या नेत्याच्या प्रकृतीसाठी ग्रामदैवताकडे साकडे!

0Share
Leave a reply