Disha Shakti

Uncategorized

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक! मोदी स्वतः पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी

Spread the love

विशेष प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मातृशोक झाला असून नरेंद्र मोदी स्वतः पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी होणार आहेत व अंत्यसंस्कारानंतर नियोजित कार्यक्रमांनाही लावणार हजेरी लावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्या 99 व्या वर्षी होत्या. अहमदाबाद येथील रुग्णालयात हिराबा यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आईच्या पार्थिवासमोर नतमस्तक होवून पुष्प अर्पण करताना. पंतप्रधान मोदी आज सकाळी 7.45 वाजता अहमदाबादला पोहोचले. येथून ते थेट गांधीनगरच्या रायसण गावात भाऊ पंकज मोदी यांच्या घरी गेले. मोदी घरी पोहोचताय अंत्ययात्रेला सुरुवात झाली. मोदी स्वत: पार्थिव खांद्यावर घेऊन अंत्ययात्रेत सहभागी झाले. शववाहनातही बसले. सेक्टर ३० येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

अंत्यसंस्कारानंतर सर्व नियोजित कार्यक्रमांना जाणार मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या सर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याची माहिती पीएमओने ट्विट करून दिली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते बंगालमधील महत्त्वाच्या प्रकल्पांचा शुभारंभही करणार आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!