Disha Shakti

Uncategorized

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भिम टायगर सेनेच्या वतीने पुसद येथे शूरविरांना मानवंदना करून समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

Spread the love

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : १ जानेवारी २०२३ रोजी भीमा-कोरेगाव विजयस्तंभाला २०५ वा वर्ष पूर्ण होणार आहेत.पुणे जिल्ह्यातील भीमा नदीच्या काठावर वसलेले कोरेगावात १जानेवारी १८१८या दिवशी कोरेगाव भीमाची लढाई झाली या लढाईची इतिहासात पेशवे विरुद्ध इंग्रज अशी नोंद असली तरी तिचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. भीमा-कोरेगावची लढाई म्हणजे अस्पृश्यतेच्या विरोधात पुकारलेले पहिले बंड होते आणि त्याच लढाईत महार समाजाला यश मिळाले. म्हणून हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो.या दिनाचे औचित्य साधुन पुसद शहरात भिम टायगर सेनेच्या वतीने शूर वीरांना मानवंदना करून समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन विश्वरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर चौक पुसद येथे करण्यात येणार आहे.अशी माहिती दि.३० डिसेंबर २०२२ रोजी विश्राम गृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजकाच्या वतीने देण्यात आली आहे.

पेशवे व इंग्रज यांच्यात झालेल्या युद्धात इंग्रजांच्या बाजूने लढत असलेल्या महार रेजिमेंटमधील सैनिकांनी पेशव्यांच्या सैनिकांचा धुव्वा उडवला. अवघ्या १६ तासांमध्ये पेहशव्यांच्या सैन्याला जेरीस आणत पराभव पत्करण्यास भाग पडलं. या युद्धात पेशव्यांच्या विरुद्ध महार रेजिमेंटच्या सैन्यांनी लढलेला समतेचा, हक्काच्या , न्यायाच्या लढाईत अनेकांनी आपले प्राण गमावले. युद्धात प्राणाची आहुती दिलेलया महार रेजिमेंटच्या सैनिकांच्या स्मृतीप्रीत्यर्थ भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभाची उभारणी करण्यात आली. या स्तंभावर युद्धात वीरमरण पत्करलेल्या सैनिकाची नावे कोरण्यात आली होती शौर्याचे प्रतीक असलेल्या विजय स्तंभाला व शूरवीरांना राज्यातील व देशातील लाखो आंबेडकरी अनुयायींच्या वतीने मानवंदना देण्यात येते या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून भिम टायगर सेना शाखा पुसदच्या वतीने शहरात भीमा कोरेगाव शौर्यदिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या शुरविराना बुध्द भिम गितातुन मानवंदना देवुन अभिवादन करण्यात येणार आहे. दि. १ जानेवारी २०२३ रोजी पुसद येथील तिन पुतळया जवळ सुजाता महिला मंडळ ईटावा वार्ड,यशोधरा महिला मंडळ तथागतनगर पुसद यांच्या हस्ते पंचशील त्रिशरण घेण्यात येईल व तिथूनच भव्य मानवंदना रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक,सुभाष चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समारोप होईल त्यानंतर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम टी.व्ही.व कॅसेट फिल्म गायिका सुषमा देवी व संच मुंबई, विकासराजा गायकवाड व संच नांदेड, धम्मदीक्षा वाहुळे लातुरकर, यांच्या शांती आणि क्रांतीवर बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन भीम टायगर सेनेचे जिल्हा अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी केले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रज्ञापर्वाचे माजी अध्यक्ष डॉ.राजेश वाढवे व उद्घाटक म्हणून डॉ. प्राचार्य प्रशांत वासनिक,मार्गदर्शक म्हणून भिम टायगर सेना विदर्भ अध्यक्ष विनोददादा फुलमाळी व विदर्भ नेते भिम टायगर सेना पंजाब दादा कांबळे उपस्थित राहतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून लोकनियुक्त आमदार इंद्रनील नाईक, विधान परिषद सदस्य आमदार ॲड. निलय नाईक, डॉ.काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव, डॉ.मोहम्मद नदीम, तर प्रमुख अतिथी म्हणून ययातीभाऊ नाईक माजी जि.प.उपाध्यक्ष हे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून प्रा.महेश हंबर्डे व प्रा.डॉ. सुनील खाडे हे राहतील.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे कपिल वासनिक अभियंता विज.वि.कंपनी, शिवाजीराव गवई सहा गटविकास अधिकारी, प्रविणकुमार वानखडे गटविकास अधिकारी उमरखेड, नानासाहेब भवरे सामाजिक कार्यकर्ता, महेश भाऊ खडसे अध्यक्ष लोकहित विद्यालय , भोलानाथ कांबळे माजी जि.प.सदस्य, प्रा.गोपाळ शेळकीकर ,डॉ. शिवाजीराव भुरके, डॉ.राहुल भगत, सुधीरभाऊ देशमुख कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड महा.प्रदेश, मारोती भस्मे बिरसा ब्रिगेड तालुकाध्यक्ष,दिलीप खैरे सामाजिक कार्यकर्ता, गजानन जाधव माणुसकीची भिंत, किशोर मुजमुले सामाजिक कार्यकर्ता, आत्माराम धाबे आदिवासी प्रकल्प अधिकारी पुसद, प्रकाश झळके उपविभागीय अभियंता सा.बा.पुसद, बंटी कावळे जिल्हा उपाध्यक्ष भिम टायगर सेना, शशांक भरणे, प्रवीण राजहंस सुप्रसिद्ध गायक प्रा.सुधीर गोटे,संदिप कावळे, विश्वास भवरे, शितलकुमार वानखेडे, पांडुरंग व्यवहारे विदर्भ अध्यक्ष बिरसा ब्रिगेड, ल.पु.कांबळे, सुखदेव भगत, अश्विनीताई पुनवटकर,दसरथ गुढे,राजेंद्र वाघमारे,निशांत बयास माजी नगरसेवक, उमाकांत पापिनवार, प्रा.विलास भवरे, लक्ष्मण कांबळे रिपाई आठवले गट शहराध्यक्ष, मारोतराव कांबळे, साकिब शाहा माजी नगरसेवक, विनोद भाऊ शेंडे विदर्भ अध्यक्ष कामगार सेना, रावण शेंडे जिल्हा प्रमुख, विजुभाऊ धुळे युवा जिल्हा अध्यक्ष ,बाबाराव उबाळे,शाम मेक्षाम उपजिल्हाप्रमुख, सिमाताई आसोले,नागसेन मनवर तालुका अध्यक्ष दारव्हा, उंर्देसर,विशाल भगत, कुमार राऊत विदर्भ प्रशिध्दी प्रमुख, शाम बनसोड जिल्हा अध्यक्ष कामगार सेना,अक्षय उईके संपर्क प्रमुख दारव्हा,सिध्दार्थ दिवेकर शहराध्यक्ष उमरखेड, अशोक चव्हाण सरपंच चिखली कॅम्प,विलास खंदारे, बाळासाहेब कांबळे, गजानन हिंगमिरे, ॲड अरिफ अहेमद कायदेशीर सल्लागार, ॲड अर्जुन राठोड,संजय कांबळे गटशिक्षणाधिकारी पं. समिती देवेंद्र खडसे माजी पं. स. सदस्य, नारायण ढोके शासकीय ठेकेदार, भारत कांबळे भारतीय बौध्द महासभा, मिलिंद हाट्टेकर नागेश कॉम्पुटर,गोपाल जगताप, प्रा.खोष झोडगे, उपस्थित राहतील. हे कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भिम टायगर सेना, भिम टायगर सेना महिला आघाडी, भिम टायगर सेना ऑटो अंबुलन्स,प्रयत्न करीत आहेत.विनित म्हणून भिम टायगर सेना महिला आघाडी प्रमुख गिताताई कांबळे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जनार्धन गजभिये,प्रा.कवी गायक प्रविण राजहंस, आंबादास वानखेडे हे करतील. या कार्यक्रमालाा जास्तीत जास्त नागरिकांनीी सहभागी व्हावे असे आव्हान आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!