Disha Shakti

Uncategorized

देशात इंडीया तायक्वांडो हीच राष्ट्रीय अधिकृत एकविध संघटना

Spread the love

प्रतिनिधी /प्रमोद डफळ : राष्ट्रीय स्तरावर तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया मध्ये दोन समांतर पदाधिकाऱ्यांचे गट निर्माण होऊन खेळाचे बाजारीकरण झाले. लालसे पोटी अनागोंदी कारभार होत असल्याचे लक्षात येताच ओलंपिक चार्टर नुसार भारतीय ऑलिंपिक संघाने तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया ची मान्यता स्थगित करून भारतीय ऑलिंपिक संघाच्या मंजुरीने TFI चे नविनिकरण इंडिया तायक्वांडो या नावाने करण्यात आले व राष्ट्रीय स्तरावर अडहोक कमेटी चे अध्यक्ष नामदेव शिरगांवकर यांना नेमून ऑलिंपिक संघाच्या शिफारशी ने इंडीया तायक्वांडो ला देशात मान्यताप्राप्त कार्यक्रमाचे आयोजन करता येण्याकरीता नियमित वर्ल्ड तायक्वांडो ची सलग्नता सुद्धा मिळविण्यात आली.

या दरम्यान न्यायालयाच्या मध्यस्थीने तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया ची निवडणूक होता होता मोठा कालावधी लोटून गेला तो पर्यंत इंडिया तायक्वांडो ला वर्ल्ड तायक्वांडो ने राष्ट्रीय संघटना TFI चे प्रकरण चिघळल्याचे बघून अडहोक कमेटी संपुष्टात आणून इंडिया तायक्वांदो चे संलग्नत्व कायम केले.इकडे कोर्टाच्या मध्यस्थीने TFI ची बिघडलेली घडी दुरुस्त करण्यासाठी निवडणुक लावली परंतु जागतीक स्तरावर चे संपुष्टात आलेले संलग्नत्व कसे मिळवता येईल यावर प्रश्न चिन्ह कायम ठेवले, पार पडलेल्या निवडणूकीत राज्य पातळीवर आताही TFI च्या बाजुने मतदान करणाऱ्या अनेक राज्यात बोगस संघटना कार्यरत आहे त्यापैकी महाराष्ट्राचा म्होरक्या विनायक गायकवाड व सचिव मिलिंद पठारे असणारी ही पण समांतर संघटना त्यामधील एक आहे.

प्रकरण असे की मध्यंतरी स्वघोषित TFI च्या एका गटाने इंग्रजांप्रमाणे प्रत्येक राज्य संघटनेत फूट पाडून जील्ह्यात समांतर गट तयार केले एक गट खेळाडूंच्या हितासाठी लढत होता तर दुसरा गट लालसे पोटी फक्त पैशासाठी काम करत होता यामधे महाराष्ट्रात एकविध असणारी तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटना ही भरडली गेली व काही काळासाठी पैशाच्या जोरावर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराणे आपला जम बसविला व महाराष्ट्रात फुट पाडून राज्य करणारा ताम चा खजिनदार विनायक गायकवाड म्होरक्या तयार झाला , महाराष्ट्रात खेळाडूंच्या हितासाठी 18 जिल्हे एकत्र येवून 2010 ला न्यायालयात दाद मागण्यात आली.

महाराष्ट्रात स्वघोषित बोगस संघटनेच्या विरोधात 18 जिल्हे एकवटल्याने समांतर गटासमोर मोठे आव्हान तयार झाले. त्यांनी TFI चे अनुसरण करत 18 जिल्ह्यात नवीन नावाने समांतर जिल्हा संघटना नोंदणीकृत केल्या तायक्वांडो खेळाला धंदा बनविण्यात आला. मास्टर माईंड विनायक गायकवाड एकविध संघटनेचा खजिनदार हाच महाराष्ट्रात दुफळी तयार करणारा व बोगस निवडणूक लढविणारा TFI च्या फुटीरवादी गटाचा सदस्य महाराष्ट्राचा तायक्वांदो तील राजकर्ता बनला व मिलिंद पठारे यांना महासचिव बनविण्यात आले. मध्यंतरी काळात खेळाचा गोरख धंधा सुरू झाला. या काळात स्वघोषित पदाधिकार्यांनी सरकारी नोकऱ्यांसाठी राज्य प्रमाणपत्रे विकणे व इतर काही अन्याय पूर्वक कामकाज केल्यामुळे पदाधिकाऱ्यांविरुद्ध अनेक गुन्हे दाखल झाले.

समांतर जिल्हा संघटना कडून न्यायालयीन खटल्यांच्या नावाखाली पैसे गोळा करणे व वापरणे. अनधिकृत रेफरी सेमिनार कार्यक्रमातून पैसा गोळा करणे व त्याचा वापर बेकायदेशीर नोटीस आणि कोर्टबाजी करन्यावर खर्च करणे असे उचापती कामकाज सुरू झाले. त्यावर ओलंपिक संघाच्या मदतीने महाराष्ट्रातील घडी दुरुस्त व्हावी यासाठी नामदेव शिरगांवकर यांची नियुक्ती अध्यक्ष म्हणून करण्यात आली .

2010 ते 2019 पर्यंत च्या दीर्घ न्यायालयीन प्रक्रिये नंतर धर्मादाय आयुक्त मुम्बई यांनी निवडणुकांची लाईव्ह सिडी च्या आधारे ताम च्या 2009 च्या निवडणुका बोगस असल्याचा आदेश दिला व तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) तटस्थ 18 जिल्हा संघटनांचे एकतेच्या व खेळाडूच्या हितासाठी लढनार्यां गटाच्या बाजूने निकाल दिला.धर्मादाय आयुक्तांच्या आदेशानंतर तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (TAM) च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना एकत्र करून अध्यक्ष नामदेव शिरगावकर यांना दखल घेणे अनिवार्य झाले.

नामदेव शिरगांवकर यांनी अनेक बैठका करून सर्वांना एकमत केले.तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (TAM) ची निवडणूक महाराष्ट्र ओलंपिक असोशिएशन निरीक्षकांच्या उपस्थितीत निर्विवाद व्यवस्थीत पार पडली. तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या कार्यकारी समितीमध्ये अध्यक्ष अनिल झोडगे व सचिव संदिप ओंबासे यांची निवड झाली. सर्वानुमते निर्णय झाले, सह्या झाल्या.. व पुर्णकालीक समीती स्थापन झाली. नंतर या लोकांना समजले की गोरख धंदा आता करता येणे शक्य नाही. एकहाती सत्ता गेल्यामुळे आता ते स्वार्थासाठी महाराष्टाला पुर्णकालीक समिती देणारे महाराष्ट्र ओलंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांची नानाविध प्रकारे बदनामी करून सोशल मीडियाद्वारे खेळाडू आणि प्रशिक्षकांची दिशाभूल करत आहेत. व तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया हीच भारतीय ओलंपिक संघटनेची मान्यता असलेली संघटना आहे असे भासवून दिशाभूल करत आहे .

ओलंपिक चार्टर नुसार कोणतीही राष्ट्रीय संघटना ही जागतीक पातळीवर संलग्न असणे आवश्यक आहे त्यालाच ओलिंपीक संघटनेची मान्यता नियमीत ठेवता येते
सध्या भारतात निर्विवाद रीत्या इंडिया तायक्वांडो हीच ओलंपिक चार्टर नुसार अधिकृत पूर्णकालीक संघटना आहे . आता भारतीय स्तरावर तायक्वांदो चे सर्व कामकाज इंडिया तायक्वांदो याच एकविध संघटनेच्या मध्यस्थीने होणार असल्याचे स्पष्ट आहे.

संघटनेने आयोजित केलेल्या सर्व उपक्रमा मध्ये सर्व संस्थागत निर्णयानुसार बाबी डिक्लेअर असतात व सगळ्यांसाठी ओपन व कॉमन असतात. मी काही व्यक्तीकरीत्या कुणाकडून ही आर्थिक व्यवहार केलेला नाही. आरोप करणार्यांना तायक्वाँडो मधील नवनविन अविष्कार पाहवत नाही आहे. लूट करीत आहेत ज्यांनी हे व्यक्तव्य केले आहे त्यांना चौकशी अंती लवकरच कायदेशीर भाषेत उत्तर मिळणार आहे.
_नामदेव शिरगांवकर_
अध्यक्ष – इंडिया तायक्वाँदो

राष्ट्रीय स्तरावर ओलंपिक चार्टर नुसार पूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे सर्व वाद संपुष्टात आले आहे व जागतीक स्तरावर इंडिया तायक्वांदो ही एकविध संघटना पुर्णकालीक कायम झालेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा मान्यता असलेली संघटनेला पुर्णकालीक संलग्न मिळालेले आहे.
संदीप ओंबासे
महासचिव – तायक्वांदो असोशिएसन ऑफ महाराष्ट्र


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!