प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : जिल्हाभर गाजलेल्या साकूर येथील ग्रामपंचायत निवडणूक ही झाली खरी पण या निवडणुकीत झालेल्या साकूर येथील जोगेपठार आदिवासी बंधूवर अन्यायाचा पाढा सुरू झालेला आहे. सविस्तर माहिती अशी कि साकूर येथील जोगेपठार येथील आदिवासी ठाकर समाजाचे पिण्याचे पाणी हे बंद करून त्यांना वणवण भटकंती करण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याने त्यांनी साकूर येथील सामाजिक युवक कार्यकर्ते सुनील नामदेव इघे यांच्याकडे धाव घेतली व आपला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्ग लावण्यासाठी विनंती केली असता महिला व लहान मुलांची व्यथा ही अत्यंत बिकट असल्याचे समोर आली. सामाजिक युवक कार्यकर्ते सुनील इघे हे आदिवासी ( जोगेपठार येथे) बांधवाच्या पिण्याच्या पाण्याचे पाहणी करण्यासाठी गेले असता. सविस्तर पाहाणी केली असता धक्कादायक घटना समोर आली कि,पिण्याच्या पाण्यात अक्षरशः जंतू व खराब पाणी असल्याचे निर्देशानस आले. सद्या सुरू असलेल्या आदिवासींना पिण्याचे स्वच्छ पाण्याची पाईपलाईन बंद करण्यात आली.कारण मतदान केले नाही त्यामुळे पिण्याचे पाणी बंद केले.
साकूर येथील ग्रामपंचायत ग्राम सभा हि दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आली असता या ग्राम सभेत जोगेपठार येथील आदिवासी महिलांच्या पिण्याच्या पाण्यासाठी होणारी भटकंती होऊ नये, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ग्राम सभेत विषय मांडला असता सुनील इघेंना दमबाजी करत शिवीगाळ करण्यात आली असता सुनील इघे म्हटले की माझा वयक्तिक प्रश्न नसून संपूर्ण जोगेपठार आदिवासी समाज बांधवांचा आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण पाण्याचा प्रश्न उपस्थित केला.परंतू सुनील इघेंना आदिवासी बांधवाच्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न मार्ग न लागल्याचे दिसले व साकूर ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि म्हटले कि तुला इथे बोलायचा अधिकार नाही तू शांत बस ,तुला काय करायचे कर म्हणत शिवीगाळ देत 100 ते 150 लोकांच्या समोर भर ग्राम सभेत मारहाण केली.
सुनील इघे व दोन मित्र हे घारगांव पोलीस स्टेशन ला जाऊन झालेल्या हाणामारीची फिर्याद दिली.परंतु फिर्याद दाखल करून येत असतानी, सामाजिक कार्यकर्ते सुनील इघेंवर भ्याड हल्ला करत जबर जखमी करण्यात आले. हिवरगांव पठार येथील घाटामध्ये दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी रात्री 9.30 ते 10.00 वाजेच्या दरम्यान सुनील इघे व त्यांचे सहकारी मित्र यांच्यावर अचानकपणे हल्ला करण्यात आला व यांच्यावर प्राण घातक हल्ला केला, यामध्ये सुनील इघे सामाजिक कार्यकर्ते यांना जबर मारहाण करण्यात आली.संगमनेर येथील खाजगी रूगणालयात उपचार सुरू आहे.
Leave a reply