Disha Shakti

Uncategorized

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माळी महासंघ, क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्था व महानगरपालिका कामगार युनियनचा संयुक्त उपक्रम

Spread the love

अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : टिळकरोड येथील श्रमिक कामगार कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कृत्रिम दंतरोपण शिबिर, दंतरोग व मोफत रक्त तपासणी शिबिराने साजरी करण्यात आली. माळी महासंघ, क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्था व अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गोरे डेंटल हॉस्पिटलच्या सहकार्याने झालेल्या या शिबीराचा महापालिका कर्मचार्‍यांनी उत्स्फुर्तपणे लाभ घेतला.मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे व डॉ. सतीश राजूरकर यांच्या हस्ते या शिबीराचे उद्घाटन झाले.

नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश बनकर, कर्मचारी आघाडी जिल्हाध्यक्ष नंदकुमार नेमाने, शहर अध्यक्ष नितीन डागवाले, कर्मचारी आघाडीचे शहराध्यक्ष राहुल साबळे, कर्मचारी आघाडीचे कार्याध्यक्ष गणेश धाडगे, कामगार युनियनचे उपाध्यक्ष अय्युब शेख, डॉ. सुदर्शन गोरे, अकिल सय्यद, बलराज गायकवाड, अमोल लहारे, अनिल लोंढे, अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. सुनिल तोडकर, रावसाहेब काळे, पोपटराव बनकर, बलभिम कुबडे, बाळासाहेब पाटोळे, सुनिल सकट, अनंत द्रवीड, आविनाश शिंदे, दत्ता राऊत, सुनिल देठे, सागर शिंदे, दिगंबर शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी फुले दांम्पत्यांचा स्त्री शिक्षणासाठीचा संघर्ष विशद केला. पाहुण्यांचे स्वागत सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर यांनी केले.डॉ.सतिश राजूरकर म्हणाले की महापुरुषांनी मानव जातीच्या कल्याणासाठी कार्य केले. महापुरुषांना जाती – धर्मात वाटून न घेता,त्यांचे विचार व कार्याची प्रेरणा घेण्याची गरज आहे. महामानवाने योगदान व कार्याची माहिती पुढील पिढीला समजल्यास ते जाती, धर्माच्या बंधनातून मुक्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ अनिल बोरगे म्हणाले की, सर्व महामानवाचे योगदान हे देवदूतासारखे असुन,त्यांचा त्याग व योगदान जनमानसात पोहोचविणे आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजन केलेले शिबिर हे एका दिवसा पुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण सप्ताहासाठी राबविण्याचा निश्चय त्यांनी केला. तर महापुरुषांच्या जयंती दिनानिमित्त मनपाच्या माध्यमातून आरोग्य शिबीर घेण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

 

या शिबिरात डॉ सुदर्शन गोरे यांनी मनपा कर्मचाऱ्यांना मौखिक आरोग्याबाबत जागृती करुन गुटखा, तंबाखू व धुम्रपानामुळे होणारे कर्करोगाची माहिती दिली. तर कृत्रिम दंतरोपणासाठी व दंतरोग समस्येबाबत तपासणी केली. तसेच यावेळी रक्त तपासणी देखील करण्यात आली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!