Disha Shakti

Uncategorized

कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ढवळपुरी यांच्यावतीने वनकुटे येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप

Spread the love

पारनेर प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : वनकुटे येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत राष्ट्रीय सेवा योजना ढवळपुरी येथील धन्वंतरी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ढवळपुरी विद्यमाने युवकांचा ध्यास ग्राम शहर विकास या विषयावर वनकुटे येथे 2 जानेवारी ते 8 जानेवारी 2023 या कालावधीमध्ये वनकुटे या गावामध्ये श्रमसंस्कार शिबिराचा समारोप झाला यावेळी. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री शाहिद काझी सर व प्रमुख उपस्थिती म्हणून वनकुटे गावचे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सुमन निवृत्ती रांधवन व वनकुटे गावचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नितीन रांधवन तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून भानुदास गागरे व धन्वंतरी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय किरण कारंडे सर व कार्यक्रमाचे अधिकारी म्हणून जमील अमीन शेख सर व जयश्री भोंडवे मॅडम यांच्या विशेष सहकार्याने हे श्रमदान शिबिर वनकुटे येथे पार पडले. ढवळपुरी येथील सर्व शिक्षक तसेच सर्व स्टाफ व आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष शहीद काझी यांनी विद्यार्थ्यांना पुढिल वाटचालीस भविष्याबद्दल मार्गदर्शन देऊन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. व तसेच डॉक्टर रांधवन यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या कामाबद्दल अभिनंदन केले तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या वृक्ष लागवडीचे संगोपन व संरक्षण करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना डॉक्टर नितीन रांधवन म्हटले असे जर आपण एकमेका साह्य करून काम करत राहिलो तर एक दिवस नक्कीच आपले गाव ,शहर, देश, झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना मनात धरून आपला देश दुष्काळ मुक्त होईल. तसेच वनकुटे गावचे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून भानुदास गागरे साहेब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच डॉक्टर रांधवन यांच्या पत्नी सौ सोनाली नितीन रांधवन यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. व विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अक्षय लेभे ,पंकज विटनोर, मीताक्षा भोंडवे, प्रतीक नरवडे यांनी सर्व एनएसएस स्वयंसेवकांच्या वतीने गावकऱ्यांना मोलाची अपेक्षा व्यक्त केली की आपण सर्व गावकऱ्यांकडून या सर्व वृक्षाचे संगोपन व संरक्षण व्हावे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!