Disha Shakti

Uncategorized

डॉ धर्मराज सुरोसे यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

Spread the love

अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : शेवगाव येथील महात्मा फुले ग्रामविकास प्रतिष्ठानचे संस्थापक तथा राष्ट्रीय अटल फाउंडेशनचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष डॉ धर्मराज एकनाथ सुरोसे यांची महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे अध्यक्ष डॉ रविंद्रजी भताने यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयीन अभियांत्रिकीय, वैद्यकीय, अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये व शाळेमध्ये कार्य करणाऱ्या ग्रंथपालांना तसेच सेट नेट पीएचडी झालेल्या प्राध्यापकांना न्याय देण्यासाठी डॉ रविंद्रजी भताने सचिव प्रा ज्ञानेश्वरजी हिलाले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रंथपालांच्या हक्कासाठी आमचा लढा हे ब्रीदवाक्य घेऊन संघटनेची वाटचाल सुरू आहे.अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक सवर्गातील ग्रंथपाल व शारिरीक शिक्षण संचालक या दोन्ही पदाचा शासन निर्णय तात्काळ काढावा. यासाठी शासनाकडे मागणी करण्यात येणार आहे. ग्रंथपाल पद भरती संदर्भात हा प्रश्न रीतसरपणे मांडून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ सुरोसे यांनी सांगितले.

या निवडीबद्दल मा नामदार चंद्रकांतदादा पाटील, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, अतुल सावे, खासदार डॉ सुजय विखे पाटील आ सुधीर तांबे,आ वसंत काळे, कपिल पाटील,आ नरेंद्रजी दराडे,आ मोनिका राजळे,आ राम शिंदे,आ बबनराव पाचपुते,आ बाळासाहेब थोरात,आ संग्राम जगताप,आ निलेश लंके महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाचे प्रा ज्ञानेश्वरजी हिलाले, गजानन खराटे, अमोल वरपे , प्रा वैशाली पानसरे, डॉ राजकुमार घुले, डॉ अशोक वैद्य, डॉ किरण गुलदगड, डॉ निलिमा थोरात, डॉ मनिषा जमादार आदी प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ धर्मराज सुरोसे यांचे या निवडीबद्दल विशेष अभिनंदन होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!