यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : पोहंडूळ गावामध्ये ग्रामपंचायत चे ४ दुकान गाळे असून सरपंच दिनेश रावते हे परस्पर वसुली करत आहे. दुकान गाळे भाडेकरू कडून नियमित पैसे सरपंच घेऊन जातात. भाडेकरू यांनी तगादा लावून पावती मांगितल्यास नमुना ७ ची सामान्य पावती देतात. परंतु ते पैसे मागील २ वर्षा पासून कधीही सामन्य निधीच्या बँक खात्यामध्ये भरलेले नाही. तसेच काही भाडेकरूंना पैसे देऊन सुद्धा पावती दिलेली नाही. दुकान गाळे निधीचा गैरवापर करण्यासाठी मागिल २ वर्षा पासून कोणतेही करारनामे करून घेतले नाही.
दुकान गाळे बाबत सचिव यांच्या कडे कॅशबूक व पासबुक मध्ये नोंद नाही. सरपंचाने गाठला बेशरमपनाचा कळस याबाबत सचिव यांना विचारांना केली असता उडवाउडवीची उत्तरे दिले. दुकान गाळे च्या ग्रामनिधीचा दुरुपयोग होत असल्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.