धाराशिव प्रतिनिधी / विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबाकाका मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास तुळजापूर विधान परिषदेचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते शुक्रवार दिनांक 13 जानेवारी रोजी प्रारंभ झाला. सहाय्यक धर्मादाय आयुक्त एस पी पाईकराव ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी एस यादव, वरिष्ठ दिवानी न्यायाधीश व्ही एस.दासरे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे निरीक्षक एस सी बनसोडे, रचना कन्स्ट्रक्शनचे दत्तात्रेय मुळे, पद्माकर फंड, शिवाजीराव नाईकवाडी या मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन, विना पूजन, ग्रंथ पूजन, टाळ पूजन, मृदंग पूजन, पताका पूजन करण्यात आले.
![]()
गाथामूर्ती ह भ प रामभाऊ महाराज राऊत यांच्या मधुर वाणीतून जगद्गुरु तुकोबाराय चरित्रकथा होणार आहे. सप्ताह कालावधीत ह भ प मधुकर महाराज सायाळ, ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर, ह भ प पुरुषोत्तम महाराज बावसकर, ह भ प बाळकृष्ण दादा वसंतगडकर, ह भ प महादेव महाराज राऊत, ह भ प योगीराज महाराज गोसावी यांची कीर्तन सेवा होणार असून काल्याचे किर्तन ह भ प रामभाऊ महाराज राऊत यांचे होणार आहे. यावेळी तेर ग्रामपंचायतच्या सरपंच सौ दीदी काळे उपसरपंच श्रीमंत फंड तसेच तेर मधील महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.तेर मधील नागरिकांनी अखंड हरिनाम सप्ताहात नामवंत कीर्तनकाराचे कीर्तन सेवा होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक समितीने केले आहे.
![]()
![]()
Leave a reply