Disha Shakti

Uncategorized

मदनवाडी ग्रामपंचायततर्फे पत्रकारांचा सन्मान व सत्कार तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजयी कन्या संध्या देवकतेचा सन्मान

Spread the love

 

प्रतिनिधी / प्रवीण वाघमोडे : दिनांक १४/०१/२०२३ : आज मदनवाडी ग्रामपंचायत तर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून भिगवन पत्रकार संघातील सर्व पत्रकार यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते, कर्मयोगी सहकारी साखर कारखाना गागरगाव हे संचालक विश्वास देवकते, ग्रामपंचायत सरपंच नानासाहेब बंडगर, उपसरपंच राजेंद्र देवकाते, माजी उपसरपंच शिवाजी देवकाते ग्रामपंचायत सर्व सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रम मदनवाडीचे ग्रामदैवत हनुमान मंदिरात आयोजित केला होता. यावेळी सर्व पत्रकारांना फेटे बांधून गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले यावेळी भिगवण पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम भाऊ शेलार भिगवण गावचे सरपंच प्रतिनिधी क्षीरसागर सर, भिगवण गावचे उपसरपंच शेख, भिगवण गावचे माजी उपसरपंच प्रदीप वाकसे, पत्रकार चवरे सर, सोलंकर सर, चितळकर सर, नानासाहेब मारकड, कांबळे, भोई, मोरे, भरत मल्लाव, संजय शिंदे, निलेश गायकवाड, धनगर शक्ती न्यूज मिडिया इंदापूर तालुका प्रतिनिधी प्रविण वाघमोडे इत्यादी उपस्थित होते .

यावेळी पत्रकार चवरे सर यांनी मार्गदर्शन करताना मदनवाडी गाव कसे बदलत आहे तसेच त्यांचे माजी विद्यार्थी राजकारण, पत्रकारिता तसेच प्रशासकीय पदावर विराजमान झाल्याचे सांगितले यानंतर सोलंकर सर, क्षीरसागर सर, भिगवन पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम भाऊ शेलार, निलेश गायकवाड, हनुमंत बंडगर जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच प्रतिनिधी नानासाहेब बंडगर, उपसरपंच राजेंद्र देवकाते यांनी मार्गदर्शन केले.यावेळी भिगवन पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम भाऊ शेलार यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मदनवाडी ग्रामपंचायत तर्फे विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी धनगर शक्ती न्यूज मिडियाचे कॅलेंडर 2023 चे प्रकाशन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सवात लांब उडी या खेळात या स्पर्धेत मदनवाडी गावातील कुमारी संध्या महादेव देवकाते हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ग्रामपंचायत तर्फे संध्या देवकाते तसेच तिला मार्गदर्शन करणारे शिक्षक बंडगर सर, वाघ सर, बंडगर मॅडम यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित सर्व सत्कारमूर्ती व नागरिक यांना अल्पोहार देण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब मारकड यांनी केले तर आभार उपसरपंच राजेंद्र देवकाते यांनी मानले व कार्यक्रम संपला.

 


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!