Disha Shakti

Uncategorized

शेवगांव पोलिसांची अवैध वाळु वाहतुकी विरुद्ध धडक मोहीम! पोलीस निरीक्षक पुजारी यांची दमदार कामगिरी वाळु वाहतुक करणारे ढंपर पकडुन 9 लाख 30 हजाराचा मुददेमाल हस्तगत

Spread the love

प्रतिनिधी /गंगासागर पोकळे  : शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना मा.पो.नि.सो यांना गुप्त बातमीदार बातमी मिळाली की,बोधेगाव ते पाथर्डी रोडने जाणारे वाळुने भरलेला एक ढंपर वाळु भरुन चोरुन घेवुन जात आहे.अशी बातमी मिळाल्याने आधोडी फाटा ता.शेवगाव येथे जावुन सापळा लावुन थांबलो.त्यानंतर 06/00 वा चे सुमारास बातमी प्रमाणे एक टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा डंपर त्याचा पासिंग क्र. एम एच 12 एचडी 8569 असलेला ढंपर आल्याने त्यास बाजुला थाबण्याचे सांगुन त्या वरील चालक नामे दीपक योसेफ गरुड वय-20 वर्ष रा.इंदिरानगर ,तिसगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर यास वाळू वाहतुकीच्या परवाना बाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडे कोणताही परवाना नसलेबाबत कळविले त्यांनी शासनाची कोणती परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू चोरी करून पर्यावरणाचा ऱ्हास करून तो वाळूची वाहतूक करताना मिळून आला आहे.म्हणुन 9,00,000/-रु.कि.एक टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा डंपर व 30000/-रु किंमतीची 3 ब्रास वाळु ढंपरमध्ये मिळुन आल्याने सदरचे वाहन जप्त़ करुन शेवगाव पोलीस स्टेशनला आणुन त्याचे विरुध्द़ पोकॉ/बप्पासाहेब धाकतोडे यांनी फिर्याद दिली आहे. ढंपर चालक दिपक योसेफ गरुड वय-20 वर्षे रा.इंदिरानगर तिसगाव ता.पाथर्डी जि.अहमदगनर यांचे विरुध्द़ कलम 379 सह पर्या.संरक्षण अधि.कलम -3,15 प्रमाणे फिर्याद देण्यात आली असुन पुढील तपास पोना /शहाजी आंधळे करीत आहे

सदरची कौतुकास्प़द कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला सो ,मा.अप्प़र पोलीस अधिक्षक सो श्री. प्रशांत खैरे साहेब ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संदिप मिटके सो यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पुजारी, पोना/शहाजी आंधळे पोकॉ/बप्पासाहेब धाकतोडे पोकॉ/राहुल खेडकर यांनी सदरची कामगिरी केली आहे.संबंधीत लोकांविरुद्ध शेवगाव पोलीस स्टेशन ला गु.रं.नं.21/2023 भा.द.वि.कलम 379,पर्यावरण कायदा कलम 3,15 प्रमाणेचा गुन्हा दिनांक 14/01/2023 रोजी 09/37 वा.दाखल करण्यात आलेला आहे. दिनांक-14/1/2023 रोजी पोनि/विलास पुजारी पोना/शहाजी आंधळे,पोकॉ/राहुल खेडकर पोकॉ/बप्पासाहेब धाकतोडे,चापोना/ सोमनाथ घुगे सर्व नेमणुक शेवगाव पोलीस स्टेशन असे सरकारी वाहनाने गस्त घालीत असताना सदर कारवाई केली सर्वांचे अभिनंदन होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!