प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात बोधेगाव, हातगाव सह ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवैधरित्या व बेकायदेशीर मुरूम उत्खननाची चौकशी करून दोषीवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी तसेच दोषींवर कारवाई न केल्यास कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव येथील हातगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. या मागणीचे लेखी निवेदन बोधेगाव येथील मुस्लिम समाजाचे नेते तथा ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, या परिसरात देसाई इंफा. प्रोजेक्ट्स ( इ. ) प्रा. लि. जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण उजव्या कालव्याचे काम सुरू असून या उजव्या कालव्याच्या सुरू असलेल्या कामासाठी महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हातगाव येथील गट क्रमांक २३८ या कोर्ट मॅटर आणि न्याय प्रविष्ट असलेल्या शेतकऱ्यांच्या शेत जमिनीतुन बेकायदेशीररीत्या तसेच कुठल्याही प्रकारची महसुल विभागाची परवानगी नसताना मोठ्या प्रमाणात अवैध मुरूमाचे उत्खनन झाले आहे.
बोधेगाव येथील गट नंबर ७९ मध्ये देखील ठिकठिकाणी नैसर्गिक प्रवाहाच्या विरुद्ध मोठमोठे खड्डे करून परवानगी तसेच प्रमाणापेक्षा जास्त मुरुमाचे उत्खनन झाल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे बोधगाव येथील गट नंबर ७९ मधील आणि हातगाव येथील २३८ या गट नंबर मधील क्षेत्राचे मुरूम उत्खनन झालेल्या जागेची लांबी-रुंदी मोजून प्रमाणापेक्षा अतिरिक्त उत्खनन झालेल्या मुरुमाचा दंड संबंधित ठेकेदार यांच्याकडून वसूल करून त्याची महसूल दप्तरी नोंद करण्यात यावी. ज्या वाहनातून या अवैध मुरुमाचे उत्खनन झाले आहे आशा वाहनावर देखील कायदेशीर दंडात्मक कारवाई करावी. तरी वरील सर्व बाबींची बारकाईने सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी तसेच दोषीवर लवकरात लवकर योग्य ती कारवाई न केल्यास कुठल्याही क्षणी शेवगाव-गेवराई राज्य महामार्गावर बोधेगाव येथील हातगाव फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच आंदोलन दरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील. असे लेखी निवेदनात म्हटले आहे. लेखी निवेदनाच्या प्रति ह्या महाराज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूलमंत्री, तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी पाथर्डी, पोलीस निरीक्षक शेवगाव, तहसीलदार शेवगाव, मंडळ अधिकारी बोधेगाव, तलाठी बोधेगाव, पोलीस दुरक्षेत्र, बोधेगव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांना माहितीसाठी दिल्या आहेत. पैठण तालुक्यातील आणि गेवराई तालुक्यातील गोदावरी नादी काठच्या गावांमधुन काही लोक चोरी केलेल्या वाहनांमधून राजरोस शेवगांव तालुक्यात वाळु वाहतुक करत आहेत यां मांजरांच्या गळ्यात घंटा बांधणार कोण