प्रमोद डफळ (प्रतिनिधी)/ नगर : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांनी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) राज्यात तायक्वांदोचे कार्य करणारी अधिकृत संघटना घोषीत केली आहे. सध्या मान्यता मिळालेल्या संघटनेला ही अनधिकृत संघटना आहे हे दाखविण्याचे आटोकाट प्रयत्न बोगस पदाधिकाऱ्याकडून करण्यात आले परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश मिळविता आले नाही.
सविस्तर असे की, मागील काळात बोगस निवडणूक करून १० वर्ष तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) या नावाने शासनाची दिशाभूल करून कामकाज करण्यात येत होते हे प्रकरण दहा वर्षानंतर कोर्टाच्या माध्यमाने निवळण्यात आले व अखेर तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) हीच संघटना महाराष्ट्रात अधिकृत आहे असे सर्व शासकीय व निमशासकीय माध्यमातून जाहीर करण्यात आले. सध्या परिस्थितीत बोगस पदाधिकारी क्रीडा विभागाची दिशाभूल करीत असल्याचे सर्वविदीत आहे. मागील दहा वर्षाच्या कालावधीत क्रीडा विभागात व बोगस पदाधिकाऱ्यांमध्ये सलोखा निर्माण झाल्याने काही जिल्ह्यात बोगस पदाधिकाऱ्यांना खतपाणी मिळत असल्याचे दिसत आहे , बोगस असल्याच्या ठपका दूर करण्याकरिता मिलिंद पठारे व सोबती वगैरे यांनी उच्च न्यायालय बॉम्बे येथे रीट याचिका दाखल केली. उपसंचालकाच्या काढलेल्या पत्राच्या व सहाय्यक नोंदणी निबंधक यांच्या निकालाच्या समकक्ष उच्च न्यायालय बॉम्बे ने सुद्धा मिलिंद पठारे व सोबती वगैरे यांची रिट याचिका फेटाळून लावली. न्याय दिल्याने मान्यता प्राप्त असलेली संघटना इंडिया तायक्वांदो संलग्नित तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) हीच संघटना कायदेशीर रित्या अधिकृत असल्याचे जाहीर झाले. सहाय्यक नोंदणी निबंधक यांच्या चौकशीमध्ये तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची निवडणूक माजी सचिव मिलिंद पठारे आणि सहकाऱ्यांनी बोगस व स्वयंघोषित पद्धतीने स्थापन केली व दहा वर्ष शासकीय निमशासकीय स्तरावर दिशाभूल केली असे आढळले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या विवाद समितीने सुद्धा दोन वर्षांच्या कामकाजाचे निरीक्षण केले आणि फेब्रुवारी २०२१ मध्ये सर्व जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधींच्या मध्यस्थीने व महाराष्ट्र ऑलिम्पिकच्या निरीक्षका समक्ष निवडणुक झाली. सर्व तपशीलवार नोंदी आणि पूर्वीच्या पुराव्यांसह असे दिसून येते की अनिल झोडगे आणि संदीप ओंबासे हे तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(कल्याण) चे अधिकृत पदाधिकारी आहेत.
महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या संलग्नतेबद्दल माजी अनधिकृत बोगस पदाधिकारी मिलिंद पठारे आणि सहकारी यांच्या रिट याचिकेवरून क्रीडा संचालनालयाने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई) ला नाकारून बेकायदेशीर घोषित केले. दिशाभूल करणारे मिलिंद पठारे व सोबती वगैरे यांच्या शेवटच्या प्रयत्नाला अपयश आले आहे. राज्याच्या क्रीडा विभागात व निमशासकीय स्तरावर पुढील कार्यकाळा करिता तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (कल्याण) अध्यक्ष अनिल झोडगे व महासचिव संदीप ओंबासे हेच अधिकृत असल्याचे शेवटक्षणी स्पष्ट झाले आहे या संघटनेलाच संलग्नित तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन अहमदनगर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते , जिल्हा सचिव घनश्याम सानप व खजिनदार नारायण कराळे आहेत. दिशाभूल करणाऱ्यांपासून सर्व खेळाडूंना व हितचिंतकांना सावध राहण्याचे आव्हान तायक्वांदो स्पोर्टस् असोसिएशन अहमदनगर च्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.या न्यायालयीन प्रक्रियेत सहभागी संदीप ओंबासे व अनिल झोडगे(आबा) तर्फे ऍडव्होकेट. श्री विनोद सांगवीकर , महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन तर्फे श्री अजिंक्य उडाने सर आणि महाराष्ट्र सरकार तर्फे श्री करण थोरात यांनी जोरदार बाजू मांडली.
बॉम्बे कोर्टाने बोगस तायक्वांदो पदाधीकाऱ्यांची याचिका फेटाळली मिलिंद पठारे व सहकाऱ्यांच्या शेवटच्या प्रयत्नाला अपयश

0Share
Leave a reply