Disha Shakti

लेख

माझे विचार- पत्रकार अक्षय करपे (लेखक)

Spread the love

आजचा माणूस मेल्यानंतर त्याच्या आठवणी वर्षाच्या आधी संपतात!
आई बाप गेल्यानंतरही त्यांच्या अंत्यविधीच्या खर्चावरूनही वाटण्या केल्या जातात!
कडू आहे? पण सत्य आहे!

आई बापाची जिंदगी जाते मुलाचे भविष्य बनवण्यासाठी! आणि मुलगा म्हणतो! माय वाइफ इज माय लाईफ!

आजचा माणूस पैशाच्या अधीन होऊन जगत असताना तो स्वतःच सर्व काही हरकून फक्त पैशामागे धावताना दिसत आहे. जीवन जगत असताना तो स्वतःसाठी कधी जगत नाही. मुला बाळांच्या आयुष्यासाठी तो रात्रंदिवस कष्ट करतो आणि एक दिवस तो मुलगा त्याला घराच्या बाहेर काढतो. मला सांगायला लाज वाटते सगळ्यात जास्त मुले जी हिंदू आहेत ती आपल्या आई बापांचा सांभाळ करीत नाही. आज आपण ज्यांनी आपल्याला जन्म दिला त्याला सर्वप्रथम जपले पाहिजे. मुले बायको नंतरची क्रिया झाली. एक आई नऊ महिने ज्या बाळाचा सांभाळ काचेच्या भांड्या पेक्षाही अधिक करते ते लेकरू जन्मल्यानंतरही डोळ्यात तेल घालून त्याला चालायला बोलायला शिकवते. ते लेकरू लग्न झाल्यानंतर आईला नको ते बोलते! ही परिस्थिती बघितल्यानंतर मनाला माझ्या खुप प्रचंड प्रमाणात वेदना होतात. अनेक आया म्हणतात लग्नानंतर मुले बदलतात! पण मी म्हणतो अशा घाणींना तुम्ही जन्म का दिला? तुम्ही त्यांना जन्म देऊन फार मोठी चुक केली हे उत्तर माझं त्यांना असतं! आपल्याला माहीत नसते पुढें जाऊन हा मुळगा आपल्याबरोबर काय करणार आहे? आजची परिस्थिती बघितल्यानंतर काही आया म्हणतात एक वेळेस वांझ रहीलेलेले बरे! हे दिवस बघण्यापेक्षा. सर्वप्रथम आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपण कमविलेल्या प्रॉपर्टीचा एक रुपयाचाही हिस्सा त्या मुलाला दिला नाही पाहिजे! असे माझे प्रथम मत आहे. आज माणूस मेल्यानंतर त्याच्या आठवणी वर्षभर साठवून ठेवता येतील अशा व्यक्ती मिळणे फार दुर्मिळ झाले आहे. आई बाप फक्त आपल्या मुलांसाठी खूप काही कष्ट करत असतात! मात्र अनेक मुलांना याची जाण नसते. एक मूल जन्माला आल्यानंतर आई बापाला अति हर्ष होतो. त्या मुलाची पाची बारी प्रथम वाढदिवस या सर्व घटना तो किती आनंदाने साजरी करीत असतो. आणि त्याच मुलाला तीच आई आणि तोच बाप सांभाळण्यासाठी जड होतो. एका आईला आणि एका बापाला सांभाळण्यासाठी मुलांमध्ये भांडणे होतात. आईबाप वारल्यानंतर त्यांच्या खर्चाची ही विभागणी करून हिस्से केले जातात. आणि दुसरीकडे आई-वडिलांना कितीही मुले असली तरी आपल्या पोटाला न खाता त्या मुलांचे संगोपन मोठ्या उत्साहात करीत असतात. काही आईबापांची काही मुले जन्मता लुळी पांगळी असतात तरीही त्यांच्या आईबाप त्यांना आपल्यावर बोझ नसल्यासारखे सांभाळून आयुष्यभर त्यांचे मोठ्या आनंदात संगोपन करतात! एका आई बापाला कधीही त्यांचे लेकरू बोझ वाटत नाही. आणि आजच्या पोरांना आई-बाप सांभाळायला फार मोठा बोझ वाटतो. तरीही आज आजची तरुणाई लग्न करून आलेल्या बाईच्या म्हणण्यानुसार आपल्या आईबापांना बरे पाहत नाही. हे कडू आहे! पण सत्य आहे.

लेखक @पत्रकार अक्षय करपे
@टाकळीमिया
तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर
९५७९९६४४०५


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!