Disha Shakti

सामाजिक

वनकुटे गावचे नवनिर्वाचित सदस्य भास्कर शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून बांधकाम कल्याणकारी योजनेचे वाटप करताना वनकुटे गावचे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच ग्रामस्थ व लाभार्थी

Spread the love

प्रतिनिधी: गंगासागर पोकळे  दि. १८ जानेवारी,  तास वनकुटे गावचे माजी उपसरपंच व नवनिर्वाचित सदस्य भास्कर शिंदे तसेच सुजित झावरे (जि. प. माजी उपाध्यक्ष) यांचे विश्वासू सहकारी व सुजित झावरे यांच्यामार्फत समाजाचे कोणतेही काम असो ते मार्गी लावतात तसं पाहिलं तर भास्कर शिंदे यांनी गोरगरीब जनतेसाठी खूप काही योजना राबवल्या. ज्यांना घर नव्हती त्यांना घरकुल मंजूर करून दिली गावातील लोकांचा पाण्याचा प्रश्‍न सोडविला. त्यांनी मागील पाच वर्ष कोणतेही पद नसताना गरीब जनतेसाठी काम करणे कधी सोडलं नाही. जनतेसाठी अहोरात्र झटत असतात. कायम लोकांच्या सुखदुःखात सामील होतात. यावेळी भास्कर शिंदे बोलताना म्हटले की आदिवासी तसेच कोणत्याही समाजाचे काम करण्यासाठी पद महत्त्वाचे नसते तर काम करणे गरजेचे असते. सुजित झावरे यांच्या विशेष प्रयत्नातून खासदार डॉ. सुजय विखे यांना लवकरच निवेदन देऊन तास वनकुटे या भागातील आदिवासी व धनगर बांधवांचे रेशन कार्ड, जातीचे दाखले, आधार कार्ड, काढण्यासाठी भास्कर शिंदे कॅम्प आयोजित करणार आहेत. तसेच आज तास येथे त्यांनी बांधकाम कल्याणकारी योजनेअंतर्गत साहित्याचे वाटप केले, त्यावेळी भानुदास गागरे डॉ. नितीन रांधवन संतोष गागरे, राजेंद्र काळनर, वाघू काळे, संदीप बिलबिले, शरद सांबारे, संतोष काळनर व काही आदिवासी बांधव उपस्थित होते. आज तास येथे बांधकाम कल्याणकारी योजना मार्फत लाभ मिळालेले लाभार्थी नंदा चंद्रकांत साळुंके, शोभा काशिनाथ पवार, राजू बंडू बर्डे, अलका राजू बर्डे, भाऊसाहेब महादू पवार, शकुंतला भाऊसाहेब पवार, अशा कमीत कमी 50 ते 60 आदिवासी बांधवांना बांधकाम कल्याणकारी योजनेचा लाभ मिळालेला आहे. वनकुटे गावचे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सुमन निवृत्ती रांधवन यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. वनकुटे गावचे नवनिर्वाचित सदस्य भास्कर शिंदे यांच्या विशेष प्रयत्नातून बांधकाम कल्याणकारी योजनेचे वाटप करताना वनकुटे गावचे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच ग्रामस्थ व लाभार्थी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!