अहमदनगर प्रतिनिधी / वसंत रांधवण : काही व्यक्ती या अशा असतात की, कितीही खडतर प्रवास असला तरी हार न मानता मार्गक्रमण करीत राहतात. यशापयशाची परवा ते कधीच करत नाहीत. फक्त आपले उद्दिष्ट ध्येयाशी प्रमाणिक राहून काम करणे हा त्यांचा स्थायी स्वभाव असतो. त्यांपैकी एक नाव माळी महासंघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष क्रांती ज्योती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ विठ्ठल बनकर कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल आंतरराष्ट्रीय सैनी समाज यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी सामाजिक, सांस्कृतिक आरोग्य विषयी कार्यात नेहमीच सक्रिय सहभाग असणारे क्रांतीज्योती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश बनकर यांना कोरोना योद्धा पुरस्कार आंतरराष्ट्रीय सैनी समाज संस्थापक जनरल सेक्रेटरी नरेश सैनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गणेश भाऊ बनकर यांचे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे, अहमदनगर महानगर पालिकाचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा माणिकराव विधाते, समता परिषद महानगराध्यक्ष दत्ता जाधव, माजी महापौर अनिल बोरूडे, डॉ सुदर्शन गोरे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरूडे तसेच समाजातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
Leave a reply