नायगाव प्रतिनिधी /साजीद बागवान : दिनांक 23 / 11 /2022 रोजी युवा नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण भाजपा तथा सामाजिक कार्यकर्ते यांच्या तक्रारी अर्जाच्या अनुषंगाने नायगाव शहर नगरपंचायत हद्दीतील नायगाव शहरासाठी मंजूर विकास योजनेनुसार गट क्रमांक 366 सर्वे नंबर 91 चे संपूर्ण क्षेत्र ना विकास शेती विभागात समाविष्ट आहे तर नायगाव शहराच्या सुधारित प्रसिद्धी केलेल्या प्रारूप विकास योजनेनुसार गट क्रमांक 366 चे आरक्षण क्रमांक 36 माहाडासाठी आरक्षित तर आरक्षण क्रमांक 37 खेळाचे मैदानासाठी म्हणून प्रत्येकी दोन हेक्टर क्षेत्रासाठी आरक्षणे प्रस्तावित असून त्यामध्ये पंधरा मीटर रुंदीचा विकास योजना रस्ता आहे.
मा तहसिलदार नायगाव यांच्याकडे तक्रारीच्या अनुषंगाने सहाय्यक संचालक नगर रचना नांदेड यांच्या अभिप्राय मागून नायगाव शहरातील नगरपंचायत सत्ताधारी व भूमाफिया लोकांनी नायगाव शहरातील नायगाव तालुक्यासह नायगाव मतदार संघातील लोकांची दिशाभूल करून करोड रुपये लूट करण्याच्या हेतूने तसेच संबंधित सर्व लोकांवरती विक्री करणाऱ्यावर निश्चितच भविष्यात कायदेशीर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल असे मत गजानन पाटील चव्हाण नायगावकर यांनी केले आहे