विशेष प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : शहरी, ग्रामीण भागातही शास्त्र ठेवण्याची अनेकांना झाली सवई गुन्हेगारीशी सबंध नसला तरी अनेकांना घरात घातक शस्त्र छंद असतो. हा छंदही कायद्याने गुन्हा आहे. पोलिसांची धाड पडल्यास कठोर कार्यवाही होऊ शकते. विशेष करून महाविद्यालयीन वद्यार्थ्यांमद्ये चाकू, तलवार,देशी कट्टा अशा प्रकारची शस्त्रांची क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे.
पोलिसांकडून सोशल मीडियासह शहरातील गतविधीवरही वॉच ठेवला जातो. एखाद्या लग्नात, वाढदिवसामद्ये तलवारी फिरविणे,देशी कट्ट्यातून फायारींग करणे हे कृत्य समोर येत आहे. भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जातो. या गुन्ह्यात शिक्षेची तरतूदही आहे, शिवाय पोलिसांच्या रेकॉर्डवर नाव गेल्याने ससेमिरा मागे लागतो तो वेगळाच. त्यामुळे घरात तलवार, बंदूक किंवा देशी कट्टा सापडल्यास त्या व्यक्तीवर कदेशिर कार्यवाही करण्यात येईल.
वर्षभरात 60 जणांवर कारवाई. मागील वर्षभरात भारतीय हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार 60 जणांविरुद्ध कार्यवाही करण्यात आली. केक कापण्यासाठी सुधा तलवारीचा वापर करत आहेत. कार्यवाही 1) वाढदिवसाचे सेलिब्रेशन आता घरी नाही तर चौकात रस्त्यावर केक कापायला तलवार वापरली जाते. अशांवर पोलिसांकडून कार्यवाही केली जाते. मनोज केदार ठाणेदार यांनी अशी माहिती दिली.
Leave a reply