धाराशीव प्रतिनिधी / विजय कानडे :- धाराशिव तालुक्यातील तेर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ मधील खेळाडूंनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपले वर्चस्व प्रस्थापित करुन शाळेचे व गावचे नाव उज्ज्वल केले आहे यावेळी मुख्याध्यापक गणपती यरकळ यांच्या हस्ते सर्व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक २० रोजी तुळजा भवानी क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत तेर ता धाराशिव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ येथील खेळाडूंनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत १४ वर्ष वयोगटात मुलींमध्ये समृद्धी जयराम माने हिने थाळी फेक क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक पटकाविला त्याचबरोबर अर्जून काकासाहेब नारे व श्रावणी शहाजी टेळे यांनी ८० मी हर्डल्स ( अडथळा ) क्रीडा प्रकारात मुलांमध्ये व मुलींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकाविला.
यावेळी या यशस्वी खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , सहशिक्षक गोरोबा पाडुळे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी मुख्याध्यापक गणपती यरकळ यांच्या हस्ते यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक गणपती यरकळ, गोरोबा पाडुळे, देशमुख शशिकांत, शेजाळ वर्षा,चौरे गोरख, क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे , नाईक उषा, मुंढे प्रभावती, हलसीकर रोहिणी, बंडगर लता, पांचाळ शकुंतला, चंदकांत गिरे, आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.