प्रतिनिधी/ गंगासागर पोकळे : विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास व्हावा या हेतूने जिल्हा परिषद मार्फत विविध गुणदर्शन स्पर्धा घेण्यात येतात. तालुका पातळीवर झालेल्या स्पर्धेत जि.प. म्हैसगाव शाळेचा समुहगीत गायन स्पर्धेत व वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत बालगटाने प्रथम क्रमांक मिळवला आहे. तालुक्यातून आलेल्या स्पर्धकांची जिल्हा पातळीवर स्पर्धा होते. शनिवार दिनांक 21-01-2023 रोजी जिल्हा पातळीवर या स्पर्धा रेसिडेन्सीअल विद्यालयात पार पडल्या. त्यामध्ये म्हैसगाव शाळेचा समुहगीत गायन स्पर्धेत जिल्हयात प्रथम क्रमांक आला व वैयक्तिक गीतगायन स्पर्धेत म्हैसगाव ‘शाळेची विद्यार्थीनी कु. सिद्धी योगेश दुधाट इ. ४ थी हिने सुद्धा बालगटात जिल्हयात तिसरा क्रमांक पटकावला आहे. या मिळालेल्या यशाबद्दल शा.व्य सामती, पालक, शिक्षणप्रेमी, तरुण मंडळे विविध संस्था अधिकारी, पदाधिकारी यांनी विजयी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.
सदर स्पर्धेसाठी शाळेतील संगीत विशारद शिक्षक श्री. गोपीनाथ तळपे सर, श्री. खामकर विष्णू सर, श्री राजेंद्र काकडे, श्री. मिस्किन किशोर सर, श्री. पुलाटे दत्तात्रय सर, श्रीम आंबेकर मीरा यांचे मार्गदर्शन लाभले शा.व्य. समितीचे अध्यक्ष श्री. योगेश दुधाट श्री. भगवान बिडवे श्री. राजेंद्र रोकडे श्री. गणेश सोनवणे – सर्व शा.व्य. समिती सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच चिखलठाण शाळेचे मुख्या श्री. सुभाष रोडे, श्री गाडेकर सर, तसेच, श्री. नवनीत लोंढे सर श्रीम पवार मॅडम व केंद्रातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले’ हा मिळालेला बहुमान एकट्या म्हैसगाव शाळेचा नसून राहूरी, तालुक्याचा आहे असे सहायक केंद्रप्रमुख श्री खामकर विष्णू यांनी सांगितले केंद्रप्रमुख श्रीम सुरेखा साळे मॅडम, विस्तार अधिकारी श्रीम काकडे मॅडम, श्री. अर्जुन गारुडकर साहेब व गटशिक्षण अधिकारी श्री. गोरक्षनाथ नजन साहेब यांनी सर्व विजयी विद्यार्थी व मागदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.
Leave a reply