Disha Shakti

कृषी विषयी

कृषि विद्यापीठात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व शिवार फेरीचे आयोजन

Spread the love

प्रतिनिधी / रमेश खेमनर : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2023 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त कृषि विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्प येथे शुक्रवार दि. 27 जानेवारी, 2023 रोजी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष व शिवार फेरी आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव संकल्प प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री डॉ. पोपटराव पवार व महाराष्ट्र राज्याचे कृषि आयुक्त श्री. सुनील चव्हाण (भाप्रसे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.               

        

           याप्रसंगी रब्बी पिकांचे पीक प्रात्यक्षिके व कृषि प्रदर्शन भरविण्यात येणार असून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पीक प्रात्यक्षिकांमध्ये रब्बी पिकांचे 18 वाण, भाजीपाला पिकांचे 18 वाण व हरभर्याचे 6 वाण असे एकुण 42 विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाचा लाभ शेतकरी बंधूंनी घ्यावा असे आवाहन विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांनी केले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!