Disha Shakti

इतर

करपे पाटील केक शॉप उतरले अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस!

Spread the love

टाकळीमिया प्रतिनिधी/अक्षय करपे: आज काल तरुण व्यवसायामध्ये पडत नाही मात्र टाकळीमिया येथे सुशिक्षित तरुण तन्मय करपे या युवकाने तरुणांना व्यवसायामध्ये उतरण्यासाठी आवाहन केले आहे. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा असतो फक्त व्यवसाय करणारा प्रामाणिक आणि कष्ट करणारा असला की व्यवसायामध्ये भरारी घेतली जाते. सविस्तर वृत्त असे की टाकळीमिया व आसपासच्या परिसरात करपे पाटील केक शॉपचे खूप मोठे नाव आहे. दर्जेदार तसेच खाण्यासाठी उत्तम क्वालिटीचे केक ग्राहकांना देऊन युवा व्यवसायिक तन्मय करपे या तरुणाने अनेक ग्राहकांची अल्पावधीत मने जिकली आहे. टाकळीमिया परिसरातील व आसपासच्या गावातील ग्राहकही वाढदिवसा व्यतिरिक्त खाण्यासाठी खास करपे पाटील केक शॉप मधून खरेदी करत असतात.

करपे पाटील केक शॉपचे चालक-मालक तन्मय करपे यांनी बोलताना म्हटले आहे की ग्राहक हा राजा असतो आणि त्याच्या आवडीनुसार आपल्याला क्वालिटी मेंटेन ठेवावी लागते. तरच आपण ग्राहकांच्या पसंतीत उतरतो. असे म्हंटले आहे. तसेच तन्मय करपे यांनी तरुणांना सल्ला देताना म्हटले आहे की अधिकाधिक तरुणांनी व्यवसायामध्ये उतरून नवनवीन व्यवसाय केले पाहिजे. त्यामुळे टाकळीमिया परिसरामध्ये करपे पाटील केक शॉपची दर्जेदार उत्पादने ग्राहकांची मने जिंकून घेत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!