Disha Shakti

Uncategorized

पाचशे रुपये कमी दिल्याच्या रागातून टुरिस्ट व्यावसायिकाचा खून

Spread the love

दिशा शक्ती पुणे/ गंगासागर पोकळे  :  पुणे, 25 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथूनही एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाचशे रुपयांसाठी टुरिस्ट व्यावसायिकाचा खून करण्यात आला आहे. तसेच आरोपी गॅरेज कामगाराने स्वतःवरही करुन घेतले वार घेतले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे क्रुझर गाडी दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ठरलेल्या व्यवहारात पाचशे रुपये कमी दिल्याच्या रागातून झालेल्या वादात टुरिस्ट व्यावसायिकाचा खुन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री 24 जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे टुरिस्ट व्यावसायिकाचा खून केल्यानंतर गॅरेज कामगाराने स्वतःवरही वार करुन घेतले. विनायक उर्फ संतोष बबन गोडसे (वय-42 रा. पिंपळवंडी) असे खुन झालेल्या टुरिस्ट व्यावसायकाचे नाव आहे. तर मयुर अशोक सोमवंशी (रा. राजुरी) असे खुन केलेल्या गॅरेज कामगार आरोपीचे नाव आहे.

याबाबत आळेफाटा पोलीस ठाण्यात सचिन भिमाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मित्र विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याची क्रुझर गाडी नंबर एमएच 14 डीटी 5308 एक महिन्यापूर्वी दुरुस्तीसाठी पुणे-नाशिक महामार्गावरील हैदरभाई यांच्या गॅरेजवर लावली होती. गाडी दुरस्ती बिलाच्या 7 हजार 600 पैकी 7 हजार 100 रुपये रोख दिले होते. गॅरेज कामगार मयुर सोमवंशी याला 500 रुपये देणे बाकी होते.उर्वरित 500 रुपयासाठी मयुरने गोडसेकडे फोनवर सारखा तगादा लावला होता. त्यातच मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांना फोनवरून शिवीगाळ केली आणि गॅरेजवर ये तुला बघून घेतो, अशी धमकी दिली. संतोष आळेफाटा चौकातून लगेच गॅरेजकडे गेला. यावेळी दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला. यातून आरोपी मयुर सोमवंशी याने संतोष गोडसे यांच्या छातीवर हातातील चाकूने वर केले. आणि नंतर स्वतःवरही वार करुन घेतले.

त्यानंतर जखमी संतोष गोडसे यांना आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. नंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सचिन जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी मयुर सोमवंशी याच्याविरोधात भादंवि कलम 302, 504, 506, 507 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे करत आहे.६टुरिस्ट व्यावसायिक विनायक उर्फ संतोष बबन गोडसे याचा खून केल्यानंतर आरोपी गॅरेज कामगार मयूर सोमवंशी याने स्वतःवरही वार करुन घेतले. पोलिसांनी त्याला तत्काळ उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये रात्री दाखल केले. त्यावर पोलीस बंदोबस्तात उपचार सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!