राहुरी प्रतिनिधी / दिपक हरिश्चंद्रे : राहुरी -(खडांबे) : महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय हाळगावच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थीनी ग्रामीण कृषि जागरूकता आणि कृषि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम व विस्तार शिक्षण विभाग अंतर्गत २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचा कार्यक्रम खडांबे खु. येथील शाहू विद्या मंदिर विद्यालयात घेण्यात आला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. सी. देशमाने सर उपस्थित होते. तसेच पर्यवेक्षक श्री.नरवडे सर, श्री. ए. आर.शिंदे सर, श्री. ए. डी. रामफळे सर, इतर शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषीकन्या मयुरी गुंजाळ हिने केले. कृषीकंन्याच्या हस्ते प्रमुख पाहुणे व शिक्षक वृंद सर्वांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमावेळी श्री.रामफळे सर व कृषीकन्या देशमुख स्वाती यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले . अश्या पद्धतीने सर्वांच्या सहकार्याबद्दल कृषीकन्या यशांजली गायकवाड हिने सर्व शिक्षक,विद्यार्थी यांचे आभार प्रदर्शन केले .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी. के ससाने सर,कार्यक्रम समन्वयक ,डॉ. सी. एस. चौधरी, विद्यार्थी कल्याण अधिकारी,डॉ. एस. ए. अनारसे,कार्यक्रम अधिकारी, डॉ. प्रेरणा भोसले , विषय तज्ञ कृषी विस्तार शिक्षण विभाग,डॉ. ए. एम. चवई,सर यांनी मार्गदर्शन केले.