प्रतिनिधी /शेख युनुस : राहुरी तालुक्यातील पश्चिमेला असलेल्या शेरी चिखलठाण येथील पंचक्रोशीतील आराध्य दैवत असलेले श्री नाथ म्हस्कोबा नाथ महाराज यात्रा उत्सव हा दरसाल दरवर्षी सालाबादप्रमाणे आयोजित करण्यात येतो,यावर्षी नाथ म्हस्कोबा महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या थाटामाटात भक्त भाविकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग नोंदवला. श्री नाथ म्हस्कोबा महाराजांची यात्रे ची सुरुवात ही आरतीने, पुजेने ढोल ताशेच्या गजरात आयोजित करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील व पुणे जिल्ह्यातील भक्त भाविकांनी हजेरी लावली. यावेळी प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र राज्याचे माजी राज्य मंत्री व आमदार प्राजक्तदादा तनपुरे,धनराज गाडे पाटील,भारतशेठ भुजाडी, व नाथ म्हस्कोबा महाराज मंदिराचे भक्त महाराज माने सतुजी भगत बाबा या मान्यवरांची घोड्यावर बसून भव्य दिव्य थाटामाटात, ताल सुरात मिरवणूक काढण्यात आली. शेरी चिखलठाण येथील लोकप्रिय कार्यसम्राट लोकनियुक्त सरपंच डॉ.सुभाष काकडे, किसन काळनर, विनोद काळनर, इसाक सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते, उपसरपंच आबासाहेब काळनर,विजय डोमाळे, अशोक डोमाळे, सयाजी डोमाळे, अहमदनगर जिल्हा पत्रकार शेख युनुस, माने काळूशेठ,टुले पाटील, खेमनर पाटील, बाचकर पाटील डोलनर पाटील, तमनर, केदार, भुतांबरे आदी भक्त महिला पुरूष,मुलांनी लाखो संख्येने चिखलठाण येथील श्री नाथ म्हस्कोबा महाराजांच्या यात्रे चा आनंद मोठ्या श्रध्देने व थाटामाटात संपन्न केला.