प्रतिनिधी /विजय कानडे : धाराशिव तालुक्यातील तेर येथे मंगळवार दिनांक 31 जानेवारी रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान टाटा सुमो गाडीमध्ये देशी दारू असल्याची माहिती गुप्त खबऱ्यांनी ढोकी पोलिसांना दिली. तेर बस स्थानक परिसरात रवींद्र जालिंदर राऊत mh-14 cx 4537 टाटा सुमो गाडीमध्ये देशी दारू च्या 472 सीलबंद बाटल्या अवैध विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे ढोकी पोलिसांना आढळून आल्याने ढोकी पोलिसांनी कारवाई करत टाटा सुमो गाडीसह एकूण सहा लक्ष 71 हजार 810 रुपये किमतीचा ऐवज जप्त करून महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम 65 (इ) अंतर्गत कारवाई करून राऊत यांना ताब्यात घेतले.
सहा महिन्या अगोदर कळंबचे सहाय्यक पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश राऊत यांच्या पथकाने रवींद्र राऊत यांच्या घरावर धाड टाकून तब्बल अडीच लाख रुपयाची बनावट दारू जप्त केली होती. राऊत यांच्यावर वारंवार कारवाई करून देखील अवैध बनावटी दारू विक्री बंद होत नसल्याने ठोस पावले उचलून कारवाई करणे अपेक्षित आहे. सदरची कामगिरी पोलीस उपनिरीक्षक बुद्धेवार, पोलीस उपनिरीक्षक गाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप मुरळीकर, पोलीस नाईक खोकले यांनी केली.
Leave a reply