यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी / स्वरूप सुरोशे : पौष्टिक तृणधान्य आहारातील महत्व आणि विविध तृणधान्यापासून आरोग्य संपन्न पदार्थ बनवून शेतकरी, महिला गटानीं अन्न प्रक्रिया उद्योग उभारावा. या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी आर्णी कार्यालयाच्यावतीने पौष्टिक तृणधान्य जनजागृती कार्यक्रम व प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न शकतात. प्रक्रिया उद्योग या विषयावर कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम आर्णी तहसील कार्यालयात पार पडले. धावपळीच्या युगात पारंपरिक अन्नधान्ये व पौष्टिक आहार सोडून फास्टफूड व विविध पॅकिंग फूडचा वापर आपण करीत आहोत. त्यामुळेच आजारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आहारात पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
या पिकांपैकी ज्वारी, बाजरी, राळा, नाचणी, भगर, राजगिरा, व कुटकी ही प्रमुख पिके आहेत. ही पिके कमी पाण्यात व कमी खर्चात येणारी आहे. यापासून जनावरांना सकस चारा उपलब्ध होतो. त्यामुळे ही पिके शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या फायद्याची ठरू शकतात.अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी दिगांबर सुळे, प्रमुख पाहुणे म्हणून नोडल अधिकारी खांदवे व विषय वीषशेज्ञ नम्रता राजस (सांगवी रेल्वे) उपस्थित होते.खांदवे व नम्रता राजस यांनी तृणधान्याचे महत्व सांगितले. स्टेट बँक ऑफ इंडिया आर्णी शाखेचे सहायक व्यवस्थापक केदार कोंडे यांनी महिलांना व गटांना कर्ज प्रक्रियसंबधी सविस्तर माहिती दिली.
यानंतर सीमा बावटकर, विलास मलाधारी व प्रेम वाटघुळे यांनी मार्गदर्शन केले. पीएम पीएम सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील लाभार्थी ज्योती तेंडोळी व अमोल विठोली यांनी अनुभव कथन केले. तसेच वंदना कावळे व सुषमा लिहितकार यांनी मनोगत व्यक्त केले. मुख संचालन प्रवीण कुंचटवार यांनी तर गजानन दळवी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रवीकुमार इंगळे, संजय चांदवे भोयर, सारंग गिरी आदी उपस्थित न्याचे होते. यशस्वितेसाठी विजय इंगळे. स्टेट नरेश डोळस, मन्मथ’ वळवते. विजय शाखेचे पवार, शंकर गिरगावकर आदींनी सहकार्य केले.