वसंत रांधवण / अहमदनगर प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोळपेवाडी, तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर. यांनी कै. सौ सुशिलाबाई उर्फ माईसाहेब शंकरराव काळे यांच्या स्मृतिपित्यर्थ भरवण्यात आलेल्या. राज्यस्तरीय भव्य वकृत्व स्पर्धेमध्ये पारनेर तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे जनता विद्या मंदिर कान्हूर पठार सहभागी होऊन प्रथम क्रमांकाचा करंडक जनता विद्या मंदिर कानूर पठारने पटकावला. यामध्ये कुमारी घुले वृषाली हिला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रमाणपत्र ट्रॉफी व पाच हजार रुपये मिळाले. तसेच कुमारी धुंदव सिद्धी हिला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक प्रमाणपत्र ट्रॉफी व तीन हजार रुपये मिळाले या दोन्ही विद्यार्थ्यांची भाषणे खूप प्रभावीपणे सादर केले विद्यालयाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी माननीय प्राचार्य वमने बाबासाहेब, पर्यवेक्षक ठुबे जयसिंग, सुहास गोरडे सर, जूनियर कॉलेजचे प्राध्यापक गंभीरे योगेश श्री जऱ्हड साहेबराव श्री धोत्रे एकनाथ ,श्रीमती शिंदे शर्मिला, सौ सुंबे वैशाली, सौदेंडगे ज्योती यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आला. स्थानिक स्कूल कमिटी सदस्य चंद्रकांत ठुबे गावातील सरपंच, उपसरपंच यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.