शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 फी शुल्कामध्ये व फॉर्म सुधारणा करण्याची निःशुल्क सुविधा देण्याची प्रेम राठोड यांची गट शिक्षण अधिकारी आर्णी मार्फत मा. शिक्षणमंत्री दिपकजी केसकर यांच्याकडे mgno मागण
यवतमाळ जिल्हा प्रतिनीधी:- महाराष्ट्र शासनाने 31पासुन जाने.2022 ते 8 फेब्रूवारी 2023 पर्यंत शिक्षक बुद्धिमत्ता चाचणी डीएड, बीएड धारक विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालु केली आहे. सदर फॉर्म ऑनलाईन करण्याचे काम आयबीपीएस ऑनलाईन या कंपनी व्दारे केल्या जात आहे. परंतु ही परीक्षा सहा वर्षा नंतर आता होताना दिसत असून, ऑनलाईन फॉर्म भरण्याची फी शुल्क जात प्रवर्गानुसार साढे आठशे ते साढे नऊशे रुपये ठेवण्यात आलेली आहे. हे ऑनलाईन फॉर्म फी शुल्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारे नसून त्यामध्ये अजून ऑनलाईन फॉर्म भरून सबमिट झाल्यास उमेदवारास त्यांच्या फॉर्ममध्ये काही चुकी आढलल्यास ऑनलाईन फॉर्म पुन्हा एडिट करण्याची सुविधा कंपनीकडून देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणें विद्यार्थ्यांना त्यांची ऑनलाईन फॉर्ममध्ये राहिलेली चुका सुधारण्याची सुविधा ऊपलब्ध नसल्याने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने तोच फार्म ऑनलाईन करावे लागत आहे व त्यासाठी अजून साढे आठशे ते साढे नऊशे रुपये ऑनलाईन करत असलेली कंपनी ला मोजावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ व फि शुल्क जास्त असल्यामुळे व ऑनलाइन फार्ममध्ये काही चूक झाल्यास परत फी शुल्क अतिरिक्त मोजावे लागत असल्यामळे सर्वसामन्य विद्यार्थ्यावर अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडत असून, काही विद्यार्थी किमान सहा वर्षानंतर घेण्यात येणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीला विद्यार्थ्याची चालू वर्षात आर्थिक पारिस्थी पाहता मुकण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गटशिक्षणाधिकारी श्री.रावते साहेब आर्णी यांच्या मार्फत शालेय शिक्षणमंत्री मा. दीपक जी केसरकर यांना निवेदनाद्वारे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 साठी आयबिपीएस कंपनी कडून आकारले जाणारे शुल्कामध्ये सवलत व विद्यार्थ्याच्या ऑनलाइन फॉर्म सबमिट झाल्यानंतर ऑनलाईन फॉर्म मध्ये कोणतेही चूक दुरुस्त करण्यासाठी, किंवा फार्म एडिट करण्यासाठी निःशुल्क सुविधा देण्यात यावी व त्यासाठी ऑनलाइन फॉर्ममध्ये असलेली चूक दुरुस्त करताना कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये. असे निर्देश सबंधित कंपनीना देन्यात यावे व विद्यार्थ्यांना होत असलेला मानसिक व आर्थिक त्रास कोठेतरी थाबविण्यात यावे अशी निवेदनातून श्री. प्रेम राठोड भाजपा माजी तालुका सचिव आर्णी यांनी मागणी केली आहे.