Disha Shakti

Uncategorized

आ.शंकरराव गडाख यांच्या हस्ते नेवासा शहरातील सी.सी.टीव्ही कॅमेराचे लोकार्पण संपूर्ण शहर सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत

Spread the love

नेवासा प्रतिनिधी / अंबादास काळे : आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून नेवासा नगरपंचायत साठी आलेल्या निधीद्वारे, सुनीताताई गडाख यांच्या मार्गदर्शना खाली व प्रशांत भाऊ गडाख यांच्या संकल्पनेतून नेवासा शहरातील सी.सी.टीव्ही कॅमेराचा आज दुपारी ०१ वाजता लोकार्पण सोहळा मोहिनीराज मंदिर परिसरात पार पडला यावेळी आ.शंकरराव गडाख यांनी सी.सी.टीव्ही कॅमेराचे रिमोटची बटन दाबून उदघाटन केले. सध्या सुरू असलेल्या मोहिनीराज यात्रेच्या पार्श्वभूमीवर नेवासा शहरात कॅमेऱ्याचे लोकार्पण झाल्याने नेवासकरांमध्ये समाधानाचे वातावरण आहे .शहरातील गणपती चौक, नगरपंचायत चौक,औदुबर चौक,मारुती चौक,श्रीराम मंदिर,भगतसिंग चौक,मोहिते चौक,पाकशाळा परिसर या परिसरातील सी सी टीव्ही कॅमेरे कार्यान्वयीत झाले असून त्यांचे सर्व नियंत्रण नेवासा पोलीस स्टेशन मध्ये असणार आहे.संपूर्ण शहरात सी.सी.टीव्ही कॅमेरा यंत्रणा लावल्याने नागरिकांनी आ.शंकरराव गडाख यांचे आभार मानले आहेत.

यावेळी मोहिनीराज देवस्थान ट्रस्ट, बडवे ट्रस्ट, मोहिनीराज यात्रा महोत्सव कमिटी, नगराध्यक्ष सतिश पिंपळे, मा.उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक राजेंद्र मापारी, नगरसेवक दिनेश व्यवहारे, योगेश रासने, मुळा सहकारी साखर कारखान्याचे संचालक नारायण लोखंडे, शिवा जंगले, जालु गवळी, शिवा राजगिरे, भैया कावरे, अनिल शिंदे, रवींद्र शेंडे, राजू कडू, आकाश एरंडे, अमित विखोना, दीपक धोत्रे, मा. नगरसेवक संजय सुखदान, मा. उपसरपंच अभिजित मापारी, महेश मापारी, विश्वजित पाटील, अशिष वर्मा, विकास खराडकर, पत्रकार अभिषेक गाडेकर, सौरभ मुनोत उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!