अ.नगर प्रतिनिधी/प्रमोद डफळ-नगर शहरात गेल्या तीन वर्षांपासून कोरोना असल्यामुळे साई ज्योती बचत गटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले नव्हते. तब्बल तीन वर्षांनी 10 ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान हे प्रदर्शन न्यू आर्टस् कॉलेजच्या मैदानावर होत असून या कृषी प्रदर्शनात कृषी संदर्भात अवजारे, बी- बियाणे तसेच पशुपक्षी प्रदर्शन देखील ठेवण्यात आलेले आहे.
दहा तारखेला दुपारी तीन वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून नगर शहरात ठिकठिकाणी या प्रदर्शनाचे बॅनर लावलेले आहेत. खाद्य पदार्थांच्या विक्रीसाठी तब्बल 300 स्टॉल असून यामध्ये इतर स्टॉल पशुधन, पशुपक्षी, विविध जातींची पिके यांचे बी बियाणे यासाठी आहेत तर शासकीय विभागाचे देखील काही स्टॉल या ठिकाणी लावण्यात येणार आहेत.
सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रदर्शनाची वेळ असून जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनात सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केलेले असून पार्किंगची व्यवस्था समोर असलेल्या पोलीस परेड ग्राउंडवर करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना पोलीस परेड ग्राउंडवर गाडी लावून त्यानंतर न्यू आर्टस् कॉलेजपर्यंत पायी जावे लागणार आहे.
प्रदर्शनामध्ये विविध पशु आणि पक्षी यांचा देखील सहभाग राहणार असून राष्ट्रीय चॅम्पियन असलेला हरियाणा येथील मुरा जातीचा तब्बल 12 कोटी रुपयांचा रेडा खास आकर्षण राहणार आहे सोबतच म्हशींच्या विविध जाती, गायींच्या विविध जाती, शेळ्या मेंढ्या अशा कृषी संदर्भातील सर्व प्राणी पक्षांची देखील माहिती या प्रदर्शनात शेतकरी बांधवाना मिळणार आहे . शहरात ठिकठिकाणी याची मोठ्या प्रमाणात जाहिरात करण्यात येत असून जिल्हाधिकारी कार्यालयासह इतरही ठिकाणी बॅनर लावण्यात आलेले आहेत.