Disha Shakti

कृषी विषयी

शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत शेळीपालनावर प्रशिक्षण वर्ग संपन्न शेळीपालन हा छोट्या शेतकर्यांसाठी किफायतशीर व्यवसाय-विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे

Spread the love

प्रतिनिधी/प्रमोद डफळ -राहुरी विद्यापीठ, दि.10 फेब्रुवारी, 2023 भारत हा कृषिप्रधान देश आहे. म्हणुन केंद्र सरकारने शेतकरी प्रथम हा कार्यक्रम सुरु केला आहे. नवनविन तंत्रज्ञान विकसीत करुन शेतकर्यांचे उत्पादन वाढून त्यांचे जीवनमान उंचविण्याचे काम महात्मा फुले कृषि विद्यापीठ करीत आहे. दिवसेंदिवस शेतकर्यांचे पशुसंवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पशुधनाची संख्या कमी होत आहे. आपले देशी जातीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. संगमनेरी शेळी ही आपल्या भागात चांगल्या प्रकारे उत्पादन देते. यासाठी शेतकर्यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरुन पशुसंवर्धन करावे तसेच शेळीपालन हा छोट्या शेतकर्यांसाठी किफायतशीर व्यवसाय असल्याचे प्रतिपादन विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्पांतर्गत कानडगाव, तांभेरे येथील शेतकर्यांना अखिल भारतीय समन्वयीत शेळी सुधार प्रकल्पात शेळी पालनाचे प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी शेतकरी प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख समन्वयक डॉ. पंडित खर्डे, अखिल भारतीय समन्वयीत संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय मंडकमाले, सहाय्यक प्राध्यापक डॉ. रविंद्र निमसे, सहसमन्वयक डॉ. सचिन सदाफळ उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. संजय मंडकमाले म्हणाले संगमनेरी शेळी ही काटक असून आपल्या वातावरणात चांगले उत्पादन देते. संगमनेरी शेळीवर रोगराई कमी येते म्हणुन शेतकर्यांनी संगमनेरी शेळीचे संवर्धन करावे. डॉ. पंडित खर्डे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. सचिन सदाफळ यांनी आभार मानले. यावेळी शेतकर्यांना मान्यवरांच्या हस्ते मफुकृवि कॅलेंडरचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये शेतकरी प्रथम प्रकल्पाचे श्री. विजय शेडगे, श्री. किरण मगर व श्री. राहुल कोर्हाळे यांनी परिश्रम घेतले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!