Disha Shakti

Uncategorized

देशसेवा करणाऱ्या दुसऱ्या पिढीतील कर्तबगार भारतीय वायुसेना नम्रता आनंदराव जाधव यांचा भव्य गौरव नागरिक सत्कार संपन्न

Spread the love

नायगाव प्रतिनिधी / साजिद बागवान : दिनांक 11 / 2 / 2023 रोजी मौजे रासुगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील देश सेवा करणाऱ्या कुटुंबीयातील दुसऱ्या पिढीतील कर्तबगार नम्रता आनंदराव जाधव (उड्डान अधिकारी भारतीय वायुसेना) व अमोल आनंदराव जाधव ( दिल्ली प्रजासत्ताक दिन कर्तव्य पथ संचलन सहभाग निवड) करण्यात आली होती या कारणास्तव दोन्हीही भूमिपुत्राचा गौरव आणि भव्य नागरिक सत्कार सन्मान करण्यासाठी उपस्थित ज्येष्ठ नागरिक तथा मार्गदर्शक भाऊराव पाटील चव्हाण, मा जिल्हा परिषद शिक्षण सभापती तथा भाजपा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर, खणकर उगवतं नेतृत्व नेते गजानन शंकरराव पाटील चव्हाण, नेते वसंत पाटील सुगावे घुंगराळकर, व्यंकटराव पाटील चव्हाण, माजी नगरसेवक प्रतिनिधी चव्हाण हरिचंद्र पाटील चव्हाण, सामाजिक भूमिका जोपासणारे शिवानंदजी पांचाळ सह या भूमिपुत्र कुटुंबाचा गौरव भव्य नागरिक सत्कार सन्मान उपस्थित सर्व नेते ग्रामवासीया तर्फे मोठ्या उत्साहात करण्यात आला तसेच देश सेवेतील कर्तबगार कुटुंब प्रमुख आपले समाजाशी काहीतरी देणे लागते या सामाजिक उद्देशाने आनंदरावजी जाधव यांच्यातर्फे या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे व सर्व रानसुगाव गावकऱ्यांना सुरुची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते उपस्थित राजकीय, सामाजिक नेते, कार्यकर्ते, व अधिकारी, कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, माली पाटील, सह मजदूर, कामगार बांधव, शेतकरी, बांधवसह मोठ्या संख्येने उपस्थित होते


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!